सॉरी मम्मी, माझे कोणासोबतच संबंध नाहीत...

वृत्तसंस्था
सोमवार, 30 सप्टेंबर 2019

सॉरी मम्मी, मी चाललोय आणि माझे कोणत्याच मुलीसोबत प्रेमसंबंध नाहीत...

लखनौः सॉरी मम्मी, मी चाललोय आणि माझे कोणत्याच मुलीसोबत प्रेमसंबंध नाहीत, असे 19 वर्षीय विद्यार्थ्याने लिहून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना येथे घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, भानू प्रताप सिंग (वय 19) या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने चिठ्ठी लिहून ठेवली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी आईसाठी पत्र लिहीले असून, त्यामध्ये कोणत्याच मुलीसोबत प्रेमसंबंध नसल्याचा उल्लेख त्याने केला आहे. याबाबत पुढील तपास सुरू आहे.

भानू प्रताप सिंग हा कॉलेजमध्ये शिक्षण घेत होता. परंतु, त्याची कॉलेजची वेळ झाल्यानंतरही तो त्याच्या खोलीमधून बाहेर न आल्यामुळे त्याची बहिणीने त्याला आवाज दिला. परंतु, कोणताही प्रतिसाद न आल्यामुळे तिने खोलीमध्ये पाहिले असता त्याने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आढळून आले. त्याच्याजवळ चिठ्ठी आढळून आली आहे. कुटुंबाकडे चौकशी केली असता त्यांनी सांगितले की, तो गेल्या काही दिवसांपासून नाराज दिसत होता. परंतु, प्रेमसंबंधाबद्दल काही बोलला नाही, असेही पोलिसांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sorry Mummy, I am not in a relationship with any girl

टॅग्स