राज्यसभेत शिट्ट्यांचा आवाज; नायडू संतप्त

राजनाथसिंहांवर विरोधकांशी बोलण्याची जबाबदारी
rajysabha
rajysabhasakal

नवी दिल्ली : आरडाओरडा सुरू आहे, टाळ्यांचा गजर होत आहे, घोषणाबाजी टिपेला पोहोचली आहे आणि अशातच काही जण शिट्ट्याही वाजवू लागतात.... नाही नाही...हे एखाद्या चित्रपटगृहातील किंवा महाविद्यालयीन स्नेहसंमेलनातील दृश्य नसून संसदेच्या वरिष्ठ सभागृहातील आहे. राज्यसभेत ( Rajya Sabha) गदारोळ सुरू असतानाच काही विरोधी पक्ष खासदारांनी शिट्या वाजवल्या. त्याबद्दल अध्यक्ष एम वेंकया नायडू यांनी नापसंती व्यक्त केली. (sound of whistles Rajya Sabha M Venkaiah Naidu angry)

दरम्यान, पेगॅसस (Pegasus) प्रकरणी विरोधी पक्षांची ठाम एकजूट पाहता सरकारने संसदेचे कामकाज चालविण्यासाठी चर्चेची तयारी केली आहे. पुढील दोन दिवस विरोधकांशी चर्चा करण्याची जबाबदारी संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्याकडे दिली.

पेगॅसस(Pegasus) प्रकरणी राज्यसभेत आजही गदारोळामुळे दुपारी १२ पर्यंत, नंतर २.३० पर्यंत व नंतर दिवसभरासाठी कामकाज तहकूब झाले. या गोंधळावेळी विरोधकांकडून टाळ्या वाजवून घोषणा दिल्या जात होत्या. काहीजणांनी अचानक शिट्या वाजवण्यास सुरवात केली. शिट्यांचा आवाज सभागृहात घुमला. त्यामुळे नायडू संतप्त झाले. ते म्हणाले, की या प्रकाराने सभागृहाची प्रतिष्ठा व मान-मर्यादा घसरली असून हे फार चिंताजनक आहे. काही जणांनी मार्शलच्या खांद्यावर हात ठेवल्याचेही मला सांगण्यात आले. जे मंत्री बोलतात ते कॅमेऱ्यात दिसू नयेत यासाठी हातातील फलक त्यांच्यासमोर धरण्यात येतात. पीठासीन अधिकाऱ्यांच्या सहनशिलतेचीही मर्यादा असते व तिचा अंत सदस्यांनी पाहू नये ,असे नायडू यांनी फटकारले.

rajysabha
न्यायाधीशांची हत्या; सर्वोच्च न्यायालयाने मागविला अहवाल

राजनाथसिंह चर्चा करणार

विरोधी पक्षांनी संसद चालवायची असेल तर आधी पेगॅससप्रकरणी चर्चेची मागणी ठामपणे लावून धरली आहे. पंतप्रधानांच्या उपस्थितीत संसदेत यावर चर्चा करावी व गृहमंत्री अमित शहा यांनी चर्चेला उत्तर द्यावे हा एकमेव तोडगा आहे, असे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी सांगितले. गोंधळामुळे दोन आठवडे पाण्यात गेल्यावर सरकारच्या वतीने या मुद्यावर चर्चेची तयारी पहिल्यांदा दाखविण्याचे संकेत मिळाले आहेत. विरोधी पक्षनेत्यांशी चर्चा करण्यासाठी संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांना सांगण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com