esakal | सौरव गांगुलीच्या आई रुग्णालयात; कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह
sakal

बोलून बातमी शोधा

Nirupa Ganguly

सौरव गांगुलीच्या आई रुग्णालयात; कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह

sakal_logo
By
सुशांत जाधव

भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे (BCCI) विद्यमान अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांच्या आई निरुपा गांगुली (Nirupa Ganguly) यांना कोरोनाची लागण झाली आहे. सोमवारी ताप आणि श्वसनाचा त्रास जाणवत असल्यामुळे निरुपा गांगुली यांना कोलकाता येथील वूडलँड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. निरुपा गांगुली यांच्यावरील उपचारासाठी पाच डॉक्टरांची टीम नियुक्त करण्यात आली आहे. या टीममधील प्रमुख सप्तर्शी बासू यांनी बुधवारी दिलेल्या माहितीनुसार, त्यांची प्रकृती स्थिर आहे.

कोरोनाला मात देण्यासाठी देशभरात मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहिम सुरु आहे. निरुपा गांगुली यांनी कोरोना प्रतिबंधक लशीचे दोन्ही डोस घेतले आहेत. तरही त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. सौरव गांगुलीचीही कोरोना चाचणी झाली असून त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचे समजते. यापूर्वी सौरवचा मोठा भाऊ स्नेहाशिष गांगुली यांना कोरोनाची लागण झाली होती. यावेळी देखील कुटुंबियांतील सदस्यांची कोरोनाच चाचणी करण्यात आली होती.

loading image
go to top