South Central Railway : रेल्वे स्थानकांवर मिळणार ज्वारीचे पीठ अन् पापड!

‘एक स्टेशन एक वस्तू’ः दक्षिण मध्य रेल्वेच्या उपक्रमात महाराष्‍ट्रातील २० स्थानक
South Central Railway
South Central Railwayesakal

South Central Railway : रेल्वे प्रवास करताना स्थानिक खाद्यपदार्थ व तेथील प्रसिद्ध वस्तू खरेदीची इच्छा झाली तर ते आता सहज रेल्वे स्थानकावरच उपलब्ध होणार आहेत. दक्षिण-मध्ये रेल्वेने त्यांच्या १०९ स्थानकांवर ‘एक स्टेशन एक वस्तू’ हा उपक्रम सुरू केला असून, त्यात महाराष्ट्रातील २० स्थानकांचा समावेश आहे.

स्थानिक उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासोबतच उत्पादकांना प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने रेल्वे स्थानकांवर स्थानिक उत्पादनाचे स्टॉल सुरू करण्यात आले आहेत. या स्टॉलवर त्या-त्या परिसरातील प्रसिद्ध वस्तू, धान्य, खाद्य पदार्थ विक्रीस उपलब्ध करून देण्यात येणार आहे. दक्षिण-मध्य रेल्वेने महाराष्ट्रातील २० रेल्वे स्थानकांची ‘एक वस्तू, एक स्थानका’साठी निवड केली आहे.

South Central Railway
Fashion Tips : पंपाने हवा भरल्यासारखी फुगते ऑर्गेंझा साडी, या टिप्स वापरा साडी चापूनचोपून बसेल

त्यात नांदेड, छत्रपती संभाजीनगर, हिमायतनगर, नागरसोल, मुदखेड आदींसह २० प्रमुख स्थानकांचा समावेश आहे. या स्थानकांवर त्या-त्या परिसरातील प्रसिद्ध वस्तू व खाद्य पदार्थांचे स्टॉल लावले जाणार आहेत. त्यात हातमागाचे उत्पादने, चटई, राजगिरा लाडू, ज्वारीचे पीठ, पापड आदींसह महाराष्‍ट्रातील प्रसिद्ध खाद्यपदार्थांचा व कलाकुसरीच्या वस्तूंचा समावेश आहे.

South Central Railway
Skin care Tips : वर्कआऊट केल्यानंतर त्वचेची अशी घ्या काळजी, फॉलो करा ‘या’ टिप्स

दक्षिण-मध्य रेल्वेच्या १०९ स्थानकांची निवड

दक्षिण मध्य रेल्वेने स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्या १०९ स्थानकांची निवड केली आहे. त्यात महाराष्ट्रातील २०, तेलंगातील ३३, आंध्रप्रदेशातील ५३, आणि कर्नाटकातील २० स्थानकांचा समावेश आहे.

South Central Railway
Parenting Tips : मुलं शाळेत जायला नकार देतायत? मग या टिप्स फॉलो करा, मुलांना लागेल शाळेत जाण्याची गोडी

चार हजार २०० लाभार्थ्यांना व्यवसायाची संधी

दक्षिण-मध्य रेल्वेच्या १०९ स्थानकांवर १२० स्टॉल लावले जाणार आहेत. त्यातून चार हजार २०० लाभार्थ्यांना व्यावसायाची संधी मिळणार आहे. महाराष्ट्रातील २० स्थानकावरील २० स्टॉलवरून ७०० जणांना व्यवसायाची संधी मिळणार आहे. स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहित करताना युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जात असल्याचे दक्षिण-मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अरूण कुमार जैन यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com