esakal | दक्षिण कोरियाचाही मदतीचा हात, भारताला पाठवणार आवश्यक वैद्यकीय मदत

बोलून बातमी शोधा

Use oxygen fairly The advice of a medical expert
दक्षिण कोरियाचाही मदतीचा हात, भारताला पाठवणार आवश्यक वैद्यकीय मदत
sakal_logo
By
टीम ई-सकाळ

नवी दिल्ली : कोरोनाच्या या बिकट संकट काळात जगातील अनेक देशांनी भारताला मदत देऊ केली आहे. अनेक देशांनी मदतीचं आश्वासन दिलं असून त्यांची मदतही लवकरच भारतात पोहोचणार नाही. त्यात आता दक्षिण कोरियाचीही भर पडली आहे. या देशानंही भारताकडे मदतीचा हात दिला असून तात्काळ वैद्यकीय उपकरणं पाठवण्याची तयारी सुरु केली आहे. दक्षिण कोरियाच्या भारतातील दुतावासानं ही माहिती दिली आहे.

दुतावासाच्या माहितीनुसार, "भारत सध्या कोरोनाच्या जागतीक महामारीशी मोठी झुंज देत आहे. यातून भारतीय नागरिकांचे जीव वाचावेत यासाठी कोरियन सरकार भारताला तात्काळ वैद्यकीय मदतीचा पुरवठा करणार आहे. भारताला सध्या ऑक्सिजन कॉन्सट्रेटर सारख्या कुठल्या सुविधांची आणि वैद्यकीय मदतीची गरज आहे, याबाबत आमची सल्लामसलत सुरु आहे. आमचा एक महत्वाचा धोरण सहकारी असलेल्या भारतासोबत कोरियन सरकारचं जवळच सहकार्य असचं आबाधित राहिल. "