
संसदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये लोकसभेत गोंधळामुळे आज सलग चौथ्या दिवशी कामकाज होऊ शकले नाही. बिहारमधील मतदारयादी फेरतपासणीच्या मुद्द्यावर आक्रमक विरोधकांमुळे कामकाज ठप्प झाल्याने नाराज लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसच्या खासदारांना खडे बोल सुनावले. तसेच या गोंधळातून नव्या पिढ्या काय शिकतील, असा उद्विग्न सवालही केला.