
नवी दिल्ली : हिमालयातील एका कथीत योगीच्या आदेशानं शेअर मार्केट चालवण्याचा आरोप असलेल्या नॅशनल स्टॉक एक्स्चेंजच्या (NSE) माजी एमडी आणि सीईओ चित्रा रामकृष्ण यांच्यावर सेबीनं कारवाई केली आहे. सध्या चित्रा यांची सीबीआयकडून चौकशी सुरु असून त्यांना कुठल्याही क्षणी अटक होण्याची शक्यता असल्यानं विशेष सीबीआय कोर्टात त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी याचिका दाखल केली होती. पण कोर्टानं शनिवारी ही याचिका फेटाळून लावली. यामुळं चित्रा रामकृष्ण यांना मोठा झटका बसला आहे. (Special CBI court dismissed anticipatory bail plea of former MD of NSE Chitra Ramkrishna)
चित्रा रामकृष्ण या एप्रिल २०१३ ते डिसेंबर २०१६ मध्ये एनएसईच्या एमडी आणि सीईओपदी कार्यरत होत्या. त्यांच्यापूर्वी एप्रिल १९९४ ते मार्च २०१३ पर्यंत नरेन हे एनएसईचे एमडी आणि सीईओ होते. नरेन यांच्या कारकीर्दीनंतर चित्रा रामकृष्ण यांची एनएसईमध्ये नॉन एक्सेक्युटिव्ह कॅटेगिरीमध्ये उपाध्यपदी नियुक्ती झाली होती. त्यानंतर त्या एप्रिल २०१३ पासून जून २०१७ पर्यंत या पदावर कार्यरत होत्या.
चित्रा रामकृष्ण यांनी हिमालयातील एका योगीच्या आदेशावरुन शेअर मार्केट चालवणाऱ्या तसेच आनंद सुब्रमण्यन यांची मुख्य रणनीती सल्लागार तसेच ग्रुप ऑपरेटिंग ऑफिसर आणि व्यवस्थापकीय संचालकांचे सल्लागार म्हणून नियुक्ती केली होती. याबद्दल सेबीनं ११ फेब्रुवारी २०२२ रोजी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. त्यामुळं चित्रा रामकृष्ण या चर्चेत आल्या होत्या.
दरम्यान, SEBI नं चित्रा रामकृष्ण यांना 3 कोटी रुपये, प्रत्येकी 2 कोटी रुपये नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे सुब्रमण्यन आणि NSE चे माजी MD आणि CEO रवी नारायण तर मुख्य नियामक अधिकारी आणि अनुपालन करणारे व्ही. आर. नरसिम्हन यांना 6 लाखांचा दंड ठोठावला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.