Aircel-Maxis Case : चिदंबरम पिता-पुत्रांना दिलासा; तूर्त अटक नाही

वृत्तसंस्था
गुरुवार, 5 सप्टेंबर 2019

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम आणि त्यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांना दिल्लीतील विशेष न्यायालयाने एअरसेल-मॅक्सिस प्रकरणात आज (गुरुवार) अटकपूर्व जामीन मंजूर केला. त्यामुळे या प्रकरणात आता त्यांना अटक होणार नाही.

नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम आणि त्यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांना दिल्लीतील विशेष न्यायालयाने एअरसेल-मॅक्सिस प्रकरणात आज (गुरुवार) अटकपूर्व जामीन मंजूर केला. त्यामुळे या प्रकरणात आता त्यांना अटक होणार नाही.

सक्तवसुली संचालनालय (ईडी) आणि केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) या दोन्ही तपास संस्थांच्या खटल्यांमधून चिदंबरम यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. पी. चिदंबरम सध्या आयएनएक्स मीडिया प्रकरणात सीबीआयच्या कोठडीत आहेत.  

पी. चिदंबरम आणि त्यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांनी एअरसेल-मॅक्सिस प्रकरणात जामिनासाठी अर्ज केला होता. त्यानंतर आता दिल्ली विशेष न्यायालयाने त्यांचा जामीन मंजूर केला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Special Court grants anticipatory bail to P Chidambaram and his son Karti Chidambaram