फ्लाय ओव्हरवरुन कोसळली मोटार; थरारक व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद (व्हिडिओ)

टीम-ई-सकाळ
रविवार, 24 नोव्हेंबर 2019

हैद्राबाद : एका वेगात असलेल्या गाडीवरचं चालकाचं नियंत्रण सुटलं आणि ती थेट उड्डाणपुलावरून खाली कोसळली. यात एका महिलेचा मृत्यू झाला तर 6 जण जखमी झाले. या घटनेचा फ्लाय ओव्हरवरून गाडी कोसळल्याचा थरारक व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. फ्लायओव्हरवरून वेगाने जात असताना चालकाचा ताबा सुटल्याने मोटार फ्लायओव्हरवरुन थेट खाली पडली. खाली रस्त्यावर ही मोटार पडल्यावर एका महिलेच्या अंगावर पडून त्यामध्ये तिचा मृत्यू झाला.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

मोटारीत प्रवास करत असलेल्या चालकासहित तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. मोटारीचा चालक अत्यंत गंभीर असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार चालू आहेत. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. 

Breaking : 'अजित पवारही राष्ट्रवादीसोबत'

हा अपघात हैद्राबाद शहरातील गाचीबोवली भागातील बायोडायव्हरसिटी जंक्शनजवळ असलेल्या फ्लाईओव्हरवर झाला आहे. चालकाचा मोटारीवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला असून लाल रंगाची फोक्सवॅगन मोटारीचा हा अपघात झाला. यावेळी आपल्या मुलासोबत रिक्षाची वाट पाहत थांबलेल्या महिलेचा मोटारीखाली येऊन मृत्यू झाला.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: speeding car skids off hyderabad flyover 1 died accident video gone viral