
वैद्यकीय सुविधांसाठीचा निधी खर्च करा, अन्यथा उशिर होईल - केंद्र
ओमिक्रॉनच्या (Omicron) वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर, केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया (Union Health Minister Mansukh Mandaviya) रविवारी राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना अत्यंत महत्वाची बाब निदर्शनास आणून दिली आहे. केंद्र आणि राज्य सरकारने एकत्रितपणे 23,123 कोटी रुपयांच्या इमर्जन्सी कोविड रिस्पॉन्स पॅकेज (ECRP-II) अंतर्गत उपलब्ध मंजूर निधीपैकी केवळ 17 टक्के निधी वारपला आहे. आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये या पॅकेजला मंजुरी दिली होती.
हेही वाचा: १५ ते १८ वर्षे वयोगटाला लसीकरण सुरु, लस घ्या - महापौर किशोरी पेडणेकर
मंडविया यांनी सर्व राज्यांचे आरोग्य मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत ही आढावा बैठक घेतली. रविवारी देशात कोरोनाच्या २७ हजारांहून अधिक नवीन रुग्णांची नोंद झाली असून सक्रिय रुग्णांची संख्याही १.२२ लाखांवर पोहोचली आहे. आठवडाभरापूर्वी म्हणजेच 26 डिसेंबर रोजी भारतात कोरोनाचे केवळ 6 हजार 531 रुग्ण नोंदवले गेले होते आणि सक्रिय रुग्णांची संख्या 75 हजार 841 होती. तुलनेत रुग्णसंख्येत मोठी वाढ होत आहे.
हेही वाचा: Omicron : तिसऱ्या लाटेत आठ मेडिकल गॅजेट्स घरी असायलाच हवेत
केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी सांगितले की, देशात याआधीच्या पीकच्या तुलनेत कोविड-19 रुग्णांच्या संख्येत तीन ते चार पटीने वाढ होत आहे. ओमिक्रॉन व्हेरीअंटच्या अत्यंत वेगाने होणाऱ्या प्रसारामुळे कोविड रुग्णांच्या संख्येतही वेगाने होणारी वाढ आरोग्य व्यवस्थेसाठी आव्हान ठरू शकते. या पार्श्वभूमीवर त्यांनी राज्यांना सल्ला दिला की, वेगाने होणाऱ्या संसर्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करणं महत्वाचं आहे. या सुधारणा करण्यासाठी कोणतीही कसर सोडू नये, जेणेकरून भारत कोविड-19 च्या उद्रेकापासून सुरक्षित राहू शकेल.
Web Title: Spend Ecrp Ii Funds For Medical Facilities Otherwise It Will Be Delayed Union Health Minister Mansukh Mandviya Covid19 Third Wave Omicron
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..