Action Against SpiceJet : स्पाईसजेटवर DGCA ची मोठी कारवाई, 50 टक्के फ्लाइट्सवर 8 आठवड्यांसाठी बंदी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

spice Jet Airlines

स्पाईसजेटवर DGCA ची मोठी कारवाई, 50 टक्के फ्लाइट्सवर 8 आठवड्यांसाठी बंदी

Action Against SpiceJet : स्पाईसजेटवर मोठी कारवाई करत नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) 8 आठवड्यांसाठी 50 टक्के फ्लाइट्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. विमानातील बिघाड होण्याच्या वाढत्या घटनांनंतर ही कारवाई करण्यात आली आहे. विविध स्पॉट चेक, तपासणी आणि स्पाइसजेटने सादर केलेल्या कारणे दाखवा नोटीसला दिलेले उत्तर लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

काही दिवसांपूर्वी डीजीसीएने स्पाइसजेटला वाढत्या तांत्रिक बिघाडांच्या घटना लक्षात घेता कारणे दाखवा नोटीस दिली होती. एअरलाइन्सच्या विमानांमध्ये वारंवार होणाऱ्या तांत्रिक त्रुटी लक्षात घेऊन ही नोटीस पाठवण्यात आली होती. गेल्या 18 दिवसांत स्पाइसजेटच्या विमानांमध्ये 8 वेळा तांत्रिक बिघाड आढळून आला होता. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागले होते. तसेच सुरक्षेचा प्रश्नदेखील ऐरणीवर आला होता.

हेही वाचा: पुणे : गणेशोत्सवासाठी पोलीस विभागाकडून नियमावली जाहीर

संबंधित कंपनीला पाठवण्यात आलेल्या नोटीशीमध्ये वाढत्या तांत्रिक घटनांमध्ये खराब अंतर्गत सुरक्षा निरीक्षण आणि अपुरी देखभाल यामुळे सुरक्षा मार्जिन कमी झाले असल्याचे नमुद करण्यात आले होते.

Web Title: Spicejet Ordered To Operate 50 Flights For 8 Weeks After Multiple Snags

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..