
एक रुग्णालयामध्ये रात्रीच्या वेळी रिकामी खुर्ची फिरतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. रिकामी खुर्ची फिरत असल्याचे रुग्णालयाच्या सीसीटीव्हीमध्ये दिसत असल्याचे म्हटले आहे.
Video : हॉस्पिटलमध्ये अंधारात फिरतेय रिकामी खुर्ची....
चंदीगडः एक रुग्णालयामध्ये रात्रीच्या वेळी रिकामी खुर्ची फिरतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. रिकामी खुर्ची फिरत असल्याचे रुग्णालयाच्या सीसीटीव्हीमध्ये दिसत असल्याचे म्हटले आहे.
रुग्णालयामधील रिकामी खुर्ची रात्रीच्या वेळी कशामुळे फिरत आहे, यामागील कारण समजू शकलेले नाही. याबाबत सत्यता तपासण्याचे काम सुरू आहे. मात्र, सीसीटीव्हीमध्ये कैद झालेल्या व्हिडिओमध्ये रिकामी खुर्ची आपोआप फिरताना दिसत आहे.
रुग्णालयामध्ये मोकळ्या खुर्चा एका बाजूला उभ्या करून ठेवल्या असून, त्यामधील एक खुर्ची निघताना दिसत आहे. रिकामी खुर्ची रुग्णालयाच्या आवारात फेरफटका मारताना दिसते. यामागे वेगवेगळी कारणे पुढे केली जात आहेत. मात्र, सत्य परिस्थिती पुढे आलेली नाही. यामुळे यामागील कारण शोधण्यासाठी व्हिडिओ तज्ज्ञांकडे पाठविण्यात आला आहे.
दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओ काही कोटींमध्ये पाहिला गेला आहे. नेटिझन्सनी प्रतिक्रियांच्या माध्यमातून भूताची भीती व्यक्त केली आहे तर काहींनी खोटे असल्याचे म्हटले आहे. पण, खरे कारण अद्याप पुढे आलेले नाही.