बिडदीजवळील केतगनहळ्ळी येथे महसूल विभागाचे अधिकारी त्यांच्या जमिनीचे सर्वेक्षण करत असताना ही जमीन ४० वर्षांपूर्वी खरेदी केली होती आणि त्यात कोणतेही बेकायदेशीर कृत्य झालेले नाही, असे कुमारस्वामी यांनी स्पष्ट केले आहे.
बंगळूर : केंद्रीय अवजड उद्योग आणि पोलाद खात्याचे मंत्री एच. डी. कुमारस्वामी (H. D. Kumaraswamy) आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी रामनगर जिल्ह्यातील बिडदीजवळील केतगनहळ्ळी येथील ७१ एकर ३० गुंठे गायरान जमिनीवर अतिक्रमण केले आहे, असा आरोप समाज परिवर्तन समुदायाचे अध्यक्ष एस. आर. हिरेमठ (S. R. Hiremath) यांनी केला.