China: 'होय, चीनने लडाखमध्ये जमीन बळकावलीये'; राहुल गांधींनतर मेहबुबा मुफ्तींचाही दावा

mehbooba-mufti
mehbooba-mufti

PDP Chief Mehbooba Mufti says China has occupied land

नवी दिल्ली- लडाखमधील मोकळ्या जागेवर चीनने ताबा मिळवल्याचा दावा माजी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला होता. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. आता जम्मू आणि काश्मिरमधील पीडीपीच्या नेत्या मेहबुबा मुफ्ती यांनीही याला दुजोरा दिला आहे. राहुल गांधी यांनी सांगितलेलं सत्य असून चीनने लडाखमधील जमीन बळकावली आहे, असं त्या म्हणाल्या. एएनआयने यासंदर्भातील माहिती दिलीये.

मेहबुबा मुफ्ती म्हणाल्या, 'राहुल गांधी सांगताहेत ते आजचं नाही. खूप वर्षांआधीच चीनचे लष्कर लडाखच्या भागामध्ये आले आहे. लेहचे लोक म्हणताहेत की ते त्यांच्या जनावरांना चरण्यासाठी तेथे घेऊन जाऊ शकत नाहीत. कारण चीनने तो भाग बळकावला आहे. हे सत्य आहे. पण, दुर्दैव असं की भारतीय जनता पक्ष हे सत्य स्वीकारण्याचं नाकारत आहे.'

mehbooba-mufti
Maharashtra Politics : लोकसभेसाठी संजय राऊत मैदानात? मुंबईतील 'या' जागेवरून लढवू शकतात निवडणूक

चीन आणि भारतीय सैन्यामध्ये गलवान खौऱ्यात हिंसाचार झाला होता. त्यावेळी दोन्ही बाजूचे सैनिक मारले गेले होते. यादरम्यान चीनने भारतीय भाग बळकावल्याचा आरोप विरोधकांकडून वारंवार करण्यात आला आहे. पण, मोदी सरकारने हा आरोप फेटाळला असून भारताचा इंचभरही भाग चीनच्या ताब्यात नसल्याचा दावा केला आहे. चीनच्या मुद्द्यावरुन दोन्ही पक्षामध्ये आरोप-प्रत्यारोप होत आहेत.

mehbooba-mufti
Bail Approved: राहुल शेवाळे बदनामी प्रकरण; उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांना कोर्टाकडून जामीन मंजूर

राहुल काय म्हणाले होते?

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी लेह दौरा केला. यावेळी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले होते की, 'येथे चिंतेची बाब म्हणजे चीनने आपली जमीन हिसकावून घेतली आहे. चिनी सैन्य या भागात घुसल्याचं लोकांचं म्हणणं आहे. त्यांची कुरनाची जमीन हिसकावून घेण्यात आली आहे, पण पंतप्रधान म्हणाले की, एक इंचही जमीन हिरावून घेतली गेली नाही, पण हे खरे नाही. तुम्ही इथे कोणालाही विचारू शकता.' (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com