Suspention : श्रीरामपूरचे पोलीस निरीक्षक संजय सानप निलंबित! | latest marathi news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Srirampur police inspector Sanjay Sanap

Suspention : श्रीरामपूरचे पोलीस निरीक्षक संजय सानप निलंबित!

श्रीरामपूर : शहरातल्या प्रभाग क्रमांक दोनमध्ये राहणार्‍या एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन तिला बळजबरी धर्मांतर करायला भाग पाडणार्‍या मुल्ला कटर या कुख्यात गुन्हेगाराशी असलेलं संगनमत श्रीरामपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय सानप यांना चांगलंच महागात पडलंय.

नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डाॅ. बी. जी. शेखर यांच्या आदेशानुसार नगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी पोलीस निरीक्षकसानप यांच्याविरुध्द निलंबनाची कारवाई केलीय.

दरम्यान, या प्रकरणी विविध संघटनांनी व स्थानिक नागरिकांनी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डाॅ. शेखर आणि जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे सातत्यानं पाठपुरावा केला.

श्रीरामपूर शहरातल्या एक अल्पवयीन मुलगी तिच्या आत्यासमवेत राहत होती. मुल्ला कटर या नराधमाची वखवखलेली नजर तिच्यावर पडली आणि त्या अल्पवयीन मुलीच्या नरकमय यातनांना सुरुवात झाली. विशेष म्हणजे हा मुल्ला कटर त्या अल्पवयीन मुलीला तिच्या आत्याच्या हातातून ओढून शेजारी असलेल्या त्याच्या खोलीत न्यायचा आणि त्या अल्पवयीन मुलीवर जबरी संभोग करायचा.

त्या मुलीची आत्या आणि अन्य काही नातेवाईकांनी श्रीरामपूरचे निलंबित झालेले पोलीस निरीक्षक संजय सानप यांच्याकडे याप्रकरणी वारंवार तक्रार देण्याचा प्रयत्न केला. मात्र सानप यांनी त्या सर्वांना हाकलून लावल्याचा आरोप अल्पवयीन मुलीच्या नातेवाईकांनी केला.

हेही वाचा: महाराष्ट्राच्या १२ जिल्ह्यांमध्ये नवीन वैद्यकीय महाविद्यालये; वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांची मोठी घोषणा

काही दिवसांनी अल्पवयीन मुलीची आत्या आणि अन्य नातेवाईकांना राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष सागर बेग यांच्याकडे मदतीसाठी प्रयत्न करण्याचा कोणी तरी सल्ला दिला. त्यानुसार अल्पवयीन मुलीची आत्या आणि अन्य नातेवाईक बेग यांच्याकडे आले. मात्र तोपर्यंत खूप उशिर झाला होता. सदर अत्याचारित अल्पवयीन मुलगी नऊ महिन्यांची गर्भवती राहिली.

पोलीस निरीक्षक सानप यांनी जर मुल्ला कटरविरुध्द यापूर्वीच कारवाई केली असती तर त्या अल्पवयीन मुलीचं आयुष्य नरकमय झालं नसतं, अशी भावना त्या अल्पवयीन मुलीचे नातेवाईक व्यक्त करत आहेत.

मात्र उशिराने का होईना नाशिकचे आय.जी. डाॅ. शेखर आणि नगरचे एस.पी. पाटील यांच्यामुळे त्या अल्पवयीन मुलाला अखेर न्याय मिळाला.

नगर जिल्ह्यात आत्तापर्यंत निलंबित झालेले अधिकारी :

बाजीराव पोवार - पीआय नेवासा

संजय सानप - पीआय श्रीरामपूर

सचिन बागुल - एपिआय सोनई

पो. हवलदार :उमेश पतंगे, संजय चव्हाण, बाबा वाघमोडे, पंकज गोसावी

हेही वाचा: कचरा गोळा करणारी ‘जयश्री’ निघाली वॉन्टेड चोर! चार राज्यात घरफोडीचे २० गुन्हे

टॅग्स :Ahmednagarsuspension