M K Stalin : स्टॅलिन यांच्याकडून घोषणांचा पाऊस; महागाई भत्त्यात वाढ, लग्नासाठी पाच लाखांपर्यंत उचल घेता येणार
Tamil Nadu News : तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी राज्य सरकारच्या कर्मचार्यांसाठी महागाई भत्ता वाढवण्याची घोषणा केली असून, लग्नासाठी पाच लाख रुपये उचल घेता येणार आहे. या घोषणांचा लाभ सुमारे १६ लाख लोकांना होईल, असे स्टॅलिन यांनी सांगितले.
चेन्नई : तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी सोमवारी विधानसभेत राज्य सरकारचे कर्मचारी आणि सरकारी शाळांमधील शिक्षकांसाठी विविध घोषणा केल्या. त्याचप्रमाणे निवृत्तीवेतनधारकांसाठीही स्टॅलिन यांनी विविध घोषणा केल्या आहेत.