
हैदराबाद : केंद्रातील मोदी सरकार दक्षिणेकडील राज्यांवर अन्याय करत असल्याची तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांची टीका आणि लोकसभा मतदारसंघ फेररचनेवरून तमिळनाडूमध्ये बैठकीचे आयोजन करण्याची घोषणा हे सर्व राजकीय हेतूने प्रेरित आरोप आणि उपक्रम आहेत, असा आरोप केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी यांनी रविवारी माध्यमांशी बोलताना केला.