
पुरी : ओडिशातील पुरी येथे जगन्नाथ रथयात्रेदरम्यान, रविवारी पहाटे झालेल्या चेंगराचेंगरीत तिघांचा जागीच मृत्यू झाला असून सुमारे ५० जण जखमी झाले आहे. मृतांमध्ये दोन महिलांचा समावेश असून जखमीपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.