गुजरातेत आजपासून 'जल अभियान' सुरू

महेश शहा
मंगळवार, 1 मे 2018

अहमदाबाद: राज्यातील पाणीपातळी खालावत असल्यामुळे गुजरात सरकारने उद्यापासून (ता. 1) "जल अभियान' सुरू करण्याचा निर्णय केला आहे. राज्याच्या स्थापनादिनानिमित्त सुरू होणारी ही मोहीम 31 मेपर्यंत चालणार आहे.

अहमदाबाद: राज्यातील पाणीपातळी खालावत असल्यामुळे गुजरात सरकारने उद्यापासून (ता. 1) "जल अभियान' सुरू करण्याचा निर्णय केला आहे. राज्याच्या स्थापनादिनानिमित्त सुरू होणारी ही मोहीम 31 मेपर्यंत चालणार आहे.

राज्यात उन्हाळ्याची तीव्रता वाढत चालली असून, भूपृष्ठावरील तसेच भूगर्भातील पाण्याची पातळी झपाट्याने घटत आहे. पाणी वाचविण्यासाठी आणि जनजागृतीसाठी उद्यापासून "सुजलाम सुफलाम जल अभियान' सुरू होत आहे. या मोहिमेंतर्गत राज्यातील 32 नद्यांचे पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्नही सरकार करणार आहे. "जल अभियानां'तर्गत सध्याच्या जलसाठ्यांचे खोलीकरण करून पाणी साठवण्याची क्षमता वाढविली जाणार असल्याचे मुख्यमंत्री विजय रूपानी यांनी सांगितले. या मोहिमेतून 11 लाख घनफूट पाणीसाठा करण्याचे उद्दिष्ट निश्‍चित करण्यात आले आहे. या पाण्याचा केवळ शेतीलाच फायदा होणार नसून, भूगर्भातील पाणीसाठाही वाढेल, असे ते म्हणाले.

अंकलेश्‍वरजवळील कोसामडी या गावात उद्या रूपानी आणि उप मुख्यमंत्री नितीन पटेल यांच्या उपस्थितीत मोहिमेला प्रारंभ होईल. मोहिमेला गती देण्यासाठ चार हजारांपेक्षा जास्त अर्थमूव्हर्स आणि आठ हजारांपेक्षा जास्त ट्रॅक्‍टर उपलब्ध केले जाणार आहेत. "जन भागीदारी'अंतर्गत सरकार आणि नागरिक या मोहिमेत सहभागी होतील, अशी माहितीही रूपानी यांनी दिली.

Web Title: Starting the Jal Abhiyan in Gujarat