
बँकिंग क्षेत्रात अलीकडच्या काळात बरेच बदल झाले आहेत. मात्र असे असतानाही ग्राहकांना अनेक वेळा खाते उघडण्यापासून ते इतर सुविधांपर्यंत अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. पण तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाचे (SBI) ग्राहक असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. तुम्ही घरी बसल्या काही मिनिटांत तुमची तक्रार नोंदवू शकता.
स्टेट बॅकच्या एका ग्राहकाने राज सिंह नावाच्या ग्राहकाने ट्विट करून लिहिले की, 'स्टेट बॅकतील आतापर्यंतचा सर्वात वाईट अनुभव. खाते उघडणे असो वा अन्य काम असो, अधिकारी एकमेकांवर ढकलत होते. आणि लक्ष देत नव्हते. यावर स्टेट बँक ऑफ इंडियाकडून 'गैरसोयीबद्दल क्षमस्व' असे उत्तर आले आणि बँकेने राज यांना तक्रार करण्याचा सल्ला दिला आहे.
ग्राहकांना तक्रार करायची असेल तर https://crcf.sbi.co.in/ccf/ या वेबसाईट वर करा.
या व्यतिरिक्त स्टेट बॅंकेने टोल फ्री नंबर सुध्दा जाहिर केला आहे. 1800 1234, 18000 2100, 1800 112211, 1800 425 3800, 080 26599990 या नंबर वर तुम्ही तक्रार दाखल करू शकता.