राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाच झाला कोरोना; अनेक मंत्र्यांच्या आले होते संपर्कात

वृत्तसंस्था
Wednesday, 8 July 2020

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांनी स्वतःला रांची येथे क्वारंटाइन करून घेतले आहे. त्यांच्या मंत्रिमंडळातील जल आणि स्वच्छतामंत्री मिथीलेश ठाकूर यांना कोरोना झाला होता.

रांची, ता. 8 (पीटीआय) ः झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांनी स्वतःला रांची येथे क्वारंटाइन करून घेतले आहे. त्यांच्या मंत्रिमंडळातील जल आणि स्वच्छतामंत्री मिथीलेश ठाकूर यांना कोरोना झाला होता. सोरेन यांचा नुकताच त्यांच्याशी संपर्क आला होता. त्यानंतर सोरेन यांना कोरोनाची लागण झाली. त्यामुळे त्यांनी स्वतःला होम क्वारंटाइन करून घेतले आहे. तसेच त्यांनी मुख्यमंत्री कार्यालयातील कर्मचाऱ्यांनाही क्वारंटाइन होण्याची सूचना केली आहे. कोरोना झालेले मंत्री लवकरच बरे होऊन परततील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. मंत्री ठाकूर आणि मथुरा महातो यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सोरेन यांच्या मंत्रिमंडळात ठाकूर यांना पहिल्यांदा कोरोनाची लागण झाली आहे.

सोरेन यांनी यासंदर्भात ट्विट करुन माहिती दिली आहे. मी सर्व महत्वाचे काम करण्याचा प्रयत्न करेन. मी सर्व लोकांना आवाहन करतो की त्यांनी गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये. बाहेर जाताना नेहमी मास्कचा वापर करा. जर मास्क नसेल तर साधा रुमाल किंवा इतर कपडा तोंड झाकण्यासाठी वापरा. एकमेकांपासून अंतर ठेवा, पण मन कायम जोडलेले ठेवा, असं ते म्हणाले आहे.

मोठी बातमी! वॅक्सीन शिवाय कोरोनाला हरवण्यासाठी वैज्ञानिकांनी लावला मोठा शोध
सोरेन यांनी दोन दिवसांपूर्वी पक्षाच्या आमदार मथुरा महतो यांची भेट घेतली होती. मंगळवारी मथुरा यांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला होता. त्याआधी जल आणि स्वच्छता मंत्री मिथिलेश ठाकूर यांना कोरोनाची लागण झाल्याचं मंगळवारी समोर आलं होतं. त्यांना राजेंद्र आयुर्विग्यान संस्थानमध्ये (रिम्स) दाखल करण्यात आले आहे. त्यांनी काही दिवसांपूर्वी सरकारी निवासगृहाचा प्रवेश कार्यक्रम ठेवला होता. यावेळी मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि त्यांच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. त्यामुळे सोरेन यांच्यासोबत अनेकांनी कोरोना झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मिथिलेश ठाकूर हे हेमंत सोरोन मंत्रिमंडळातील कोरोना संक्रमित झालेले पहिले मंत्री ठरले आहेत. ठाकूर कुठे आणि कशाप्रकारे कोरोना संक्रमित झाले याबाबत शोध घेतला जात आहे. मंगळवारपर्यंत झारखंडमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 3,018 झाली आहे. तर आतापर्यंत राज्यात कोरोनामुळे 22 लोकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. देशात साडेसात लाख कोरोना बाधित सापडले आहेत. तर आतापर्यंत 20 हजारांपेक्षा अधिक रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. शिवाय दररोज देशात 20 हजारांपेक्षा अधिक कोरोनाबाधित सापडत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The state chief minister was infected with corona