esakal | मोदीजी, नोटाबंदी, जीएसटीची घाई टाळायला हवी होती; मनमोहनसिंग बरसले
sakal

बोलून बातमी शोधा

ms.jpg

देशातील मंदावलेल्या अर्थव्यवस्थेला निव्वळ पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचा व्यवस्थापनातील गोंधळ जबाबदार आहे, असे मत माजी पंतप्रधान आणि अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहनसिंग यांनी आज व्यक्त केले आहे.

मोदीजी, नोटाबंदी, जीएसटीची घाई टाळायला हवी होती; मनमोहनसिंग बरसले

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली : देशातील मंदावलेल्या अर्थव्यवस्थेला निव्वळ पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचा व्यवस्थापनातील गोंधळ जबाबदार आहे, असे मत माजी पंतप्रधान आणि अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहनसिंग यांनी आज व्यक्त केले आहे.

एका व्हिडिओच्या माध्यमातून डॉ. मनमोहनसिंग यांनी सरकारच्या धोरणांवर जोरदार टीका केली आहे. देशात उद्भवलेली परिस्थिती ही मानव निर्मित असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता नरेंद्र मोदी यांनी हाडवैराचे राजकारण बाजूला ठेवावे आणि या सर्व विवेकी विचारांपर्यंत पोहचून देशापुढील हे आर्थिक संकट दूर करावे, असे आवाहन डॉ. मनमोहनसिंग यांनी केले आहे. 

देशाची अर्थव्यवस्था सध्या मंदावली आहे. सरकारकडून दोन दिवसांपूर्वी जीडीपीचे आकडे जाहीर केले असून, सध्याच्या जीडीपी गेल्या सहा वर्षांतील निचांकी पातळीवर आहे. देशाचा जीडीपी दर ५ टक्क्यांवर आला आहे. २०१८-१९ या आर्थिक वर्षातील जून अखेर संपलेल्या पहिल्या तिमाहीतील ही आकडेवारी असून, आधीच्या तिमाहीत जीडीपी ५.८ टक्क्यांवर होता. गेल्या वर्षी याच पहिल्या तिमाहीमध्ये डीजीपी दर ८ टक्क्यांवर होता.

या परिस्थितीची माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी दखल घेतली आहे. सरकारवर टीका करताना डॉ. मनमोहनसिंग म्हणाले, ‘आपल्या देशाला सातत्याने अशी मंदावलेली परिस्थिती परवडणारी नाही. त्यामुळेच मी सरकारला राजकारण बाजूला ठेवून, विवेकी लोकांपर्यंत पोहोचण्याचे आवाहन करतो. जेणे करून आपल्याला आपल्याला या मानवनिर्मित संकटातून भारतीय अर्थव्यवस्थेला बाहेर काढता येईल. गेल्या तिमाहीतील पाच टक्के जीडीपी हा आपण, दीर्घकाळ मंदीच्या फेऱ्यात जाण्याचे लक्षण आहे.’ सरकारच्या धोरणांवर टीका करणारा डॉ. मनमोहनसिंग यांचा व्हिडिओ एएनआय वृत्तसंस्थेने शेअर केला आहे. 

देशाला १९९१मध्ये आर्थिक संकटातून तारणारे व्यक्तीमत्व म्हणून डॉ. मनमोहनसिंग यांची ओळख आहे. त्यावेळी नरसिंहराव यांच्या सरकारमध्ये डॉ. मनमोहनसिंग अर्थमंत्री होती. तत्पूर्वी, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणूनही त्यांनी काम केले होते. त्यामुळे डॉ. मनमोहनसिंग यांच्यासारख्या अर्थतज्ञ्याने देशातील आर्थिक परिस्थितीवर केलेले भाष्य महत्त्वाचे मानले जात आहे.

डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना २०१३ मध्ये जीडीपी ४.३ टक्यांवर आला होता. त्यानंतर सध्याची आकडेवारी सर्वांत निचांकी आहे. सध्या देशातील ऑटोमोबाईल सेक्टरपासून बिस्किट निर्मितीपर्यंत अनेक उद्योग संकटात आहेत. अनेक ठिकाणी नोकऱ्यांमध्ये कपात केली जात आहे. या परिस्थितीचे दूरगामी परिणाम होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

loading image
go to top