PM Narendra Modi : राजकीय लाभांसाठी लोकानुयायी योजना राहबू नका; पंतप्रधान नरेंद्र मोदी

देशाच्या आर्थिक आरोग्यासाठी राज्यांनाही आपल्या धोरणांना अर्थशिस्त लावावी लागेल तरच राज्यांनाही विकासाच्या प्रवासाचा लाभ घेता येईल.
States discipline their policies economic health journey of development People oriented scheme
States discipline their policies economic health journey of development People oriented scheme Esakal

नवी दिल्ली - देशाच्या आर्थिक आरोग्यासाठी राज्यांनाही आपल्या धोरणांना अर्थशिस्त लावावी लागेल तरच राज्यांनाही विकासाच्या प्रवासाचा लाभ घेता येईल. तत्कालीन राजकीय लाभांसाठी पुढच्या पिढ्यांना गंभीर परिणाम भोगावे लागतील अशा लोकानुयायी योजना राहबू नका, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिला.

'काही लोकांना हे समजून घ्यावे लागेल की, हा देश कौटुंबिक मालमत्ता व जाहीरदारी नाही तर १४० कोटी सामान्य देशवासीयांच्या घामाने आणि पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या परंपरांनी घडलेला हा देश आहे असा टोला त्यांनी लगावला. मोदी यांनी आज राज्यसभेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावरील आभार दर्शक ठरावावरील चर्चेस उत्तर दिले.

पंतप्रधानांचे भाषण सुरू होताच काॅंग्रेस व विरोधी पक्षाच्या सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली.ती भाषण संपेपर्यंत सुरूच होती. घोषणाबाजी आणि गदारोळातही पंतप्रधानांनी भाषण सुरू ठेवले व पूर्णही केले. त्यांच्याकडे चिखल होता, माझ्याकडे गुलाल होता. ज्याच्याकडे होती, त्यांनी चिखल उसळला.

पण लक्षात ठेवा जितका चिखल टाकाल तितके कमळ फुलेल, अशी गर्जना मोदींनी केली. त्यांचे भाषण सुरू होते व दुसरीकडे ``मोदी-अदानी भाई भाई, देश बेचकर खाई मलाई ``, तसेच `` जुमलाबाजी बंद करो `` यासारख्या घोषणांनी सभागृह दणाणून गेले होते. रंजीता रंजन, इम्रान प्रतापगढी, संजय सिंह आदी घोषणा देण्यात आघाडीवर होते.

तथापि पंतप्रधानांनी आजही उद्योगपती गौतम अदानी यांना दिलेल्या विशेष सरकारी लाभांवरील आरोपांबाबत एकही शब्द उच्चारला नसल्याचे निरीक्षण विरोधी खासदारांनी नोंदवले. या सभागृहात जे घडत आहे ते देश गांभीर्याने ऐकतो, मात्र काही लोकांच्या या वर्तनाने सभागृहाचीच नव्हे तर देशाचीही निराशा होत आहे असे पंतप्रधान म्हणाले.

पंतप्रधानांनी आपल्या सरकारच्या कामगिरीची आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखालील मागील सरकारची तुलना करताना अनेक योजनांचा आढावा घेतला व अखोरीस घोषणाबाजी करणाऱयांवर एकामागोमाग एक प्रहार केले.

देश ही कोणत्याही कुटुंबाची जहागीरदारी नाही असे सांगताना पंतप्रधान म्हणाले की ११० आकांक्षी जिल्ह्यांचा विकास करण्याचा निश्चय आम्ही केला त्यातील निम्मे आदिवासीबहुल होते. किमान ३ कोटी आदिवासी बांधवांना केंद्रीय योजनांचा थेट लाभ मिळाला आहे.

माझ्या सरकारने पदपथावरील किरकोळ विक्रेते व छोटे व्यापारी, शेतकरी, भटके, विश्वकर्मा समुदाय आदी दुर्लक्षित घटकांना आर्थिक लाभ दिले जे आतापर्यंतच्या विरोधकांच्या सरकारांना सुचले नव्हते.

दोन वेळच्या भाकरीचे स्वप्न पाहणाऱ्यांकडे तुम्ही लक्ष दिले नाही असे सांगून मोदी म्हणाले की तुम्हाला सामाजिक न्याय दिसला नाही, आम्ही पाहिला. संधी उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही पावले उचलली. मुक्त भारताची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी निर्धाराने वाटचाल करूया.

मेजर ध्यानचंद यांच्या नावाने आम्ही खेलरत्न दिले आहे. अंदमानच्या बेटांना सुभाषचंद्र बोस, परमवीरचक्र विजेत्यांच्या नावावरून नावे देण्यात आली. हिमालयाचे शिखर एव्हरेस्ट आहे तर आम्ही बेटांची नावे परमवीर चक्र विजेत्यांच्या नावावर ठेवलीत असेही मोदी म्हणाले.

दरम्यान आभारदर्शक ठरावाला मंजुरी घेताना राज्यसभाध्यक्ष जगदीप धनखड यांनी , घोषणाबाजी करणाऱया सदस्यांचे वर्तन लज्जास्पद आहे असे सांगताच काॅंग्रेस सदस्य चिडले. धनखड यांनी विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांना हरकतीचा मुद्दा मांडण्यास परवानगी नाकारली व भूपेंद्र यादव यांना परवानगी दिली त्याच्या निषेधार्थ काॅंग्रेस व विरोधकांनी सभात्याग केला.

नेहरू आडनावरून गांधी कुटुंबाला टोमणे मारताना पंतप्रधान म्हणाले की कोणत्याही कार्यक्रमात नेहरूजींच्या नावाचा उल्लेख केला नाही तर काही लोकांचे रक्त उसळते. पण मला हे समजत नाही की जर नेहरू महान होते, तर त्यांच्या कुटुंबातील कोणीही नेहरू आडनाव का ठेवत नाही ?

नेहरू आडनाव ठेवायला यांना किती लाज वाटते. अशी महान व्यक्ती तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला मान्य नाही... आणि तुम्ही आमचा हिशेब मागता ? असा तीव्र सवाल मोदींनी केला.

`सारा देश पाहतो आहे की एकच व्यक्ती या अनेकांचा सामना करत आहे. यांना घोषणाबाजी करायलाही माणसे बदलावी लागतात पण मी एकटा गेले तासभर बोलतोय आणि थांबलेलो नाही. त्यांच्यात एवढी हिंमत नाही, म्हणून ते पळून जाण्याचा मार्ग शोधत आहेत.``

- पंतप्रधान नरेंद्र मोदी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com