स्टॅच्यू ऑफ युनिटीला तीन लाख पर्यटकांची भेट

पीटीआय
बुधवार, 13 नोव्हेंबर 2019

सुटीच्या काळात वाढ
दिवाळीच्या काळात दररोज सरासरी २२ हजार ४३४ पर्यटकांनी भेट दिली. गेल्या वर्षी दिवाळीच्या काळात दररोज सरासरी १४ हजार ९१८ पर्यटकांनी भेट दिली होती. या वर्षी पर्यटकांच्या संख्येत दुपटीने म्हणजेच ५०.४ टक्के वाढ झाली आहे. एकंदरीत, दररोज सरासरी ९ हजार ६३ नागरिकांनी स्टॅच्यू ऑफ युनिटीला भेट दिली. शनिवार-रविवार वगळता पर्यटकांची सरासरी ७ हजार ३० राहिली, तर वीकेंडला हाच आकडा १३ हजार ७१ पर्यंत पोचला. या पर्यटनातून विभागाला ८०.६५ कोटी रुपये उत्पन्न मिळाले आहे.

अहमदाबाद - यंदा दिवाळी सुटीच्या काळात दहा दिवसांत स्टॅच्यू ऑफ युनिटीला २ लाख ९१ हजार पर्यटकांनी भेट दिल्याची माहिती गुजरात सरकारने दिली. सरदार पटेल मेमोरिअलचे गेल्या वर्षी ३१ ऑक्‍टोबर रोजी उद्‌घाटन करण्यात आले होते. तेव्हापासून ते आजतागायत २९ लाख ३२ हजार पर्यटकांनी भेट दिल्याचे म्हटले आहे. 

स्टॅच्यू ऑफ युनिटीची उभारणी झाल्यानंतर पहिल्याच वर्षी १ नोव्हेंबर २०१८ ते ३१ ऑक्‍टोबर २०१९ या काळात २७ लाख १७ हजार पर्यटकांनी भेट दिली. यंदाच्या कालावधीत पहिल्या दहा दिवसांत दोन लाख ९१ हजार पर्यटकांनी भेट दिली आहे. पर्यटक संख्येत वाढ होत असल्याचे सरकारने म्हटले आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: statue of unity 3 lakh tourism