esakal | राहू बाई एकटीच! : आधुनिक भारतीय स्त्रीबद्दल कर्नाटकच्या आरोग्यमंत्र्यांचे मत | Desh
sakal

बोलून बातमी शोधा

desh

राहू बाई एकटीच! : आधुनिक भारतीय स्त्रीबद्दल कर्नाटकच्या आरोग्यमंत्र्यांचे मत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बंगळूर : भारतातील बहुतांश आधुनिक महिलांना अविवाहित राहावेसे वाटते; विवाह झाल्यानंतरही मुल जन्मास घालण्याची त्यांची इच्छा नसते, त्यांना सरोगसीच्या माध्यमातून मातृत्व हवे असते...ही विधाने केली आहेत एका राज्याच्या मंत्र्याने. उल्लेखनीय बाब म्हणजे ते आरोग्य मंत्री असून डॉक्टर सुद्धा आहेत.

कर्नाटकचे आरोग्य मंत्री के. सुधाकर यांनी ही विधाने केली आहेत. मुख्य म्हणजे जागतिक मानसिक आरोग्य दिनी राष्ट्रीय मानसिक आरोग्य आणि मज्जातंतू विज्ञान संस्थेच्या व्यासपीठावर ते बोलत होते. ही विधाने करताना खेद वाटतो, अशी भावना व्यक्त करून ते म्हणाले की, आपल्या विचारसरणीत किती बदल झाला आहे याचे हे उदाहरण आहे, जे काही चांगले नाही.

कोविड-१९ आणि मानसिक आरोग्याबद्दल डॉ. सुधाकर म्हणाले की, आपले प्रियजन या विषाणूचे बळी ठरल्यानंतर त्यांच्या पार्थिव देहाचे अंत्यदर्शन घेणेही नातेवाइकांना शक्य झाले नाही. त्यामुळे त्यांना मानसिक यातनांना सामोरे जावे लागले. जागतिक साथीमुळे सरकारला समुपदेशन सुरु करावे लागले. आतापर्यंत कर्नाटकात २४ लाख कोरोना रुग्णांचे समुपदेशन करण्यात आले. अशी कामगिरी इतर कोणत्या राज्यांनी केल्याची माहिती आपल्याला नाही.

संस्थेच्या कार्याबद्दल त्यांनी सांगितले, डिजिटल तसेच टेली-मेडीसीनच्या माध्यमातून समुपदेशन केले जात आहे.

loading image
go to top