
स्टॉक मार्केटचे 'बिग बुल' राकेश झुनझुनवाला यांचं निधन
स्टॉक मार्केटमध्ये बिग बुल म्हणून ओळखले जाणारे व्यावसायिक राकेश झुनझुनवाला यांचं आज निधन झालं आहे. ते ६२ वर्षांचे होते.मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांचं निधन झालं आहे. भारतातल्या अतिशय लोकप्रिय गुंतवणूकदारांमध्ये ते आघाडीवर होते. त्यांच्या प्रत्येक गुंतवणुकीकडे भांडवली बाजाराचं लक्ष असायचं.
राकेश झुनझुनवाला हे गुंतवणूक क्षेत्रातील दिग्गज होते. भारताचे वॉरेन बफे अशी त्यांची ओळख होती. कारण, बाजारातील नफा आणि तोटा याची अचूक जाण त्यांच्याकडे होती आणि त्यामुळेच त्यांनी खरेदी केलेले स्टॉक मालामाल होतात असं म्हटलं जातं.
झुनझुनवाला हे एक व्यापारी असून ते सीए होते. हंगामा मीडिया आणि अॅपटेकचे ते चेअरमन असून व्हॉईसरॉय हॉटेल्स, कॉनकॉर्ड बायोटेक, प्रोवोग इंडिया आणि जिओजित वित्तीय सेवा या कंपन्यांच्या संचालकीय मंडळातही त्यांचा समावेश होता.