पोलिसांनी कल्याणगिरी येथून सुरेश याला अटक केली आहे. त्याने अपमानजनक पोस्ट केल्याचा संशय आहे. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
बंगळूर : समाजकंटकाने केलेल्या अपमानास्पद पोस्टमुळे संतप्त झालेल्या तरुणांच्या गटाने उदयगिरी पोलिस ठाण्यावर (Udayagiri Police Station) दगडफेक केली. त्यात सहायक पोलिस आयुक्त आणि निरीक्षकासह १४ पोलिस जखमी झाले. १० हून अधिक पोलिस वाहनांचे नुकसान झाले. शहरातील परिस्थिती नियंत्रणात असली तरी तणाव आहे.