Satellite Aryabhatta : भारताच्या पहिल्या उपग्रहाचा खर्च किती होता? नाव कसं ठरलं? वाचा 'आर्यभट्ट'ची चित्तरकथा!

India's First Satellite : आज जगभरातील विविध देश आपल्या उपग्रहाच्या उड्डाणासाठी प्राधान्याने भारताची निवड करतात..
Aryabhatta Satellite
Aryabhatta Satellitesakal

- चेतन झडपे

भारताने १९७५ या वर्षी एक ऐतिहासिक पाऊल टाकले. या ऐतिहासिक पावलाचं नाव होतं 'आर्यभट्ट'. भारताचा पहिला-वहिला उपग्रह 'आर्यभट्ट' लाँच झाल्यानंतर भारताचा अंतराळ क्षेत्रातल्या प्रवासाची दमदार सुरूवात झाली. आज हा प्रवास चंद्र, मंगळ आणि सूर्यापर्यंत जाऊन पोहचला आहे. मात्र हा प्रवास आज वाटतो तवेढा सोपा नक्कीच नव्हता. (India's first Satellite)

या प्रवासात भारतापुढे अनंत अडचणी होत्या. भारताला स्वातंत्र्य मिळून अवघी काहीच वर्षे झाली होती. भारत एक गरिब देश होता. तरीही भारताने या अनंत अडचणींवर मात करत, आपला पहिला-वहिला उपग्रह अवकाशात यशस्वीपणे पाठवला. (Aryabhatta Satellite)

भारत आज त्या मोजक्या काही देशांमध्ये आहे, ज्यांनी पृथ्वीच्या कक्षेत उपग्रह स्थापन करण्यात यश मिळवले आहे. भारताचं यशस्वी आणि जगातलं आर्थिकदृष्ट्या सर्वात किफायतशीर मंगळयान यशानंतर भारताकडे आज अंतराळ क्षेत्रात अद्भूत कामगिरी करणारा देश म्हणून पाहिलं जातं. (ISRO)

आज जगभरातील विविध देश आपल्या उपग्रहाच्या उड्डाणासाठी प्राधान्याने भारताची निवड करतात. मात्र भारताच्या पहिल्या उपग्रहाची कथा आज वाटते तेवढी सोपी नव्हती. भारत एक गरिब देश होता, विज्ञानाचा प्रसार झाला नव्हता. अशा काळात एखाद्या उपग्रहाची निर्मिती करून तो अवकाशात उड्डाणासाठी पाठवणे म्हणजे एक दिव्यच होतं. (Satellite Aryabhatta)

उपग्रहाच्या निर्मितीची पार्श्वभूमी -

भारताच्या पहिल्या उपग्रहाची कथा सुरू होते ते महान अंतराळ शास्त्रज्ञ विक्रम साराभाई यांच्यापासून. साराभाई हे भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक मानले जातात. साराभाईंनी आपले सहकारी यू आर राव यांच्याकडे स्वदेशी बनावटीचे उपग्रह निर्माण करण्याचं महत्त्वपूर्ण काम सोपवलं.

राव यांच्याकडे हे दिव्य काम सोपवण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे, ते एकमेव असे भारतीय होते ज्यांनी नासाच्या दोन उपग्रह निर्मितीत काम केले होते. यानंतर इसरो संस्थेने राव यांच्या नेतृत्त्वात मोठी मेहनत घेवून, उपग्रह तयार केलं. या उपग्रहाचं वजन तब्बल ३६० किलो वजनाचं होतं.

उपग्रह निर्मितीचा उद्देश

या उपग्रहाला कर्नाटक राज्यातील बंगळुरू शहरात तयार करण्यात आलं. अंतराळातील क्ष - किरणे, खगोलशास्त्र संशोधन असे उद्देश डोळ्यासमोर ठेवून या उपग्रहाची निर्मिती करण्यात आली होती.

भारताच्या पहिल्या-वहिल्या उपग्रहाचं नामकरण कसं झालं?

उपग्रह तयार झाल्यानंतर निर्मिती करणाऱ्यांच्या लक्षात आलं की, उपग्रहाला नावच देण्यात आलं नाही. उपग्रहाचं नामकरण करण्यासाठी अनेक नावांचा विचार पुढे आला. तत्कालीन भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यापुढे तीन नावांचे प्रस्ताव ठेवण्यात आले होते. ते तीन नावं होते मैत्री, जवाहर आणि आर्यभट्ट. या उपग्रहाचं उड्डाण आपण रशियाच्या साहाय्याने करणार होतो.

म्हणून मैत्री हे एक नाव पुढे आलं. दुसरं नाव होतं जवाहर. पहिले पंतप्रधान व पंडित इंदिरा गांधी यांचे वडिल जवाहरलाल नेहरू यांच्या ही नावाचा प्रस्ताव पुढे आला होता. मात्र ही दोन्ही नावे इंदिरा गांधींनी नाकारली. तिसरं नाव होतं आर्यभट्ट. भारताचे महान खगोलपंडित आणि गणितज्ञ यांचे नाव या उपग्रहाला देणं इंदिरा गांधींनी पसंत केलं.

वेळ आणि पैसा किती झाला खर्च ? -

आर्यभट्ट उपग्रह तयार करण्यासाठी जवळपास तीस महिन्यांचा मोठा कालवधी लागला. यावर जवळपास साडेतीन कोटी रूपये इतका खर्च झाला. १९७० च्या दशकात

साडेतीन कोटी रूपये ही फार मोठी रक्कम होती. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधीया भारतीय अंतराळ क्षेत्राच्या विकासासाठी फारच आग्रही होत्या. त्यांनी आर्यभट्ट उपग्रहासाठी संसंदेतून तीन कोटी रूपयांचा निधी मंजूर करून दिला.

अवकाशात झेपावला भारताचं आर्यभट्ट :

भारताचा पहिला उपग्रह बनून तयार होतं.आता तो क्षण आला होता, भारताचं स्वप्न साकार होणार होतं. १९ एप्रिल १९७५ तो दिवस. रशियान बनावटीच्या रॉकेट कॉसमॉस 3 एम या रॉकेटमधून भारताच्या आर्यभट्टाचं प्रक्षेपण झालं. काहीच वेळात आर्यभट्ट पृथ्वीच्या कक्षेत जाऊन पोहचला.

कक्षात पोहचल्यानंतर पाचव्या दिवशीच उपग्रहाच्या इलेक्ट्रीक सिस्टममध्ये बिघाड झाला. या उपग्रहाने काम करणं बंद केलं. मात्र या पाच दिवसात आवश्यक तो डाटा इसरोने संपादन केलं होतं. काही वर्ष हा उपग्रह कार्यरत राहिला. १७ वर्षानंतर १० फेब्रुवारी १९९२ ला आर्यभट्ट पृथ्वीवर येऊन आदळला.

या सर्वामध्ये जो मार्ग आर्यभट्टने भारताला दाखवला, आज त्या मार्गावर भारत सक्षमपणे पावलं टाकत आहे. अंतराळक्षेत्रात भारत नव-नवे ध्येय गाठत आहे. इतिहासात आर्यभट्टाने शून्याचा शोध लावून, शून्याचं महत्त्व सांगून भारताचं नाव जगाच्या पटलावर कोरले. यानंतर आर्यभट्ट उपग्रहाने अंतराळातील प्रवास करून भारताला एक ऐतिहासिक सुरूवात दिली

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com