Madhya Pradesh Election: कैलाश विजयवर्गीय यांच्या मुलाचे तिकीट भाजपनं कापलं; 2019 मधील ते प्रकरण भोवलं?

भोपाळ- मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केली
story of kailash vijayvargiya son akash vijayvargiya ticket cut in mp bjp releases fifth list politics marathi news
story of kailash vijayvargiya son akash vijayvargiya ticket cut in mp bjp releases fifth list politics marathi newssakal
Updated on

Madhya Pradesh Election: भोपाळ- मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केली असून, यामध्ये ९२ उमेदवारांना निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहे. भाजपचे राष्ट्रीय महासचिव कैलाश विजयवर्गीय यांचे पुत्र आकाश विजयवर्गी यांना उमेदवारी मिळालेली नाहीये. आकाश इंदौर -३ विधानसभा मतदारसंघातून आमदार होते. त्यांचे तिकीट कापल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या आहेत. आकाश विजयवर्गीय यांचं तिकीट कापण्यामागे २०१९ चे प्रकरण असल्याचं बोललं जातंय.

अधिकाऱ्याला क्रिकेट बॅटने मारहाण केल्यामुळे नाराज वरिष्ठ नेते

२०१९ मध्ये आकाश विजयवर्गीय यांनी अधिकाऱ्याला क्रिकेट बॅटने मारहाण केल्यामुळे चर्चेत आले होते. इंदौरमध्ये एका मोडकळीस आलेल्या घरावर महानगर पालिकेकडून कारवाई करण्यात येत असताना आमदार आकाश विजयवर्गीय आपल्या समर्थकांना घेऊन त्या ठिकाणी आले. तेथे उपस्थित अधिकाऱ्याला त्यांनी क्रिकेट बॅटने मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाला होता.

नंतर अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले की अशी काही घटनाच घडली नाही. परंतु राजकीय विश्लेषकांच्या मतानुसार या प्रकरणामुळे आकाश विजयवर्गीय यांच्यावर भाजपचे वरिष्ठ नेते नाराज होते. त्यामुळे अंदाज लावला जात आहे की अधिकाऱ्याला मारहाण प्रकरणामुळे त्यांचे तिकीट कापले आहे.

जेपी नड्डा यांना केले होते आवाहन

विधानसभा निवडणुकांसाठी भाजपने दिग्ग्ज नेते कैलाश विजयवर्गीय यांना इंदौर -१ विधानसभा मतदार संघातून मैदानात उतरवले आहे. कैलाश विजयवर्गीय यांनी म्हटलं होतं की त्यांच्या मुलानेच तिकीट नाकारलं आहे. ते म्हणाले की, "मुलगा आकाश यांनी भाजप नेते जेपी नड्डा यांना पत्र लिहिले होते. त्या पत्रात त्यांनी लिहिले होते की, त्यांना तिकीट देण्यात येऊ नये. इंदौर -३ विधानसभा मतदार संघात आकाश ऐवजी राकेश गोलू शुक्ल याना उमेदवारी देण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.