कर्नाटकात चेकपोस्टवर कडक निर्बंध; मुख्यमंत्र्यांचे आदेश

महाराष्ट्रातून कर्नाटकात येणाऱ्यांवर निर्बंध घातले आहेत.
basavaraj bommai
basavaraj bommaiSakal

बेळगाव : महाराष्ट्र आणि खासकरून मुंबईत (Mumbai)कोरोनाचे (Coronavirus)रुग्ण वाढल्याने कडक निर्बंध आणि खबरदारी बाबत आदेश दिले आहेत. सीमावर्ती भागातील चेकपोस्ट ठिकाणी कोविडचे दोन डोस आणि प्रमाणपत्र तपासणीचे आदेश बजाविण्यात आल्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (CM Basavaraj Bommai) यांनी रविवारी (ता.२) बेळगाव (Belguam) येथील सांबरा विमानतळावर (Sambra Airport) पत्रकारांशी बोलताना सांगितले.

दोन आठवड्यापासून महाराष्ट्र (Maharashtra)आणि खासकरून मुंबईत ओमिक्रॉन (Omicron)रुग्णांत वाढ झाली आहे. यामुळे सरकारने खबरदारी घेण्यास सुरु केली आहे. चाचण्या आणि लसीकरण वाढविण्याचे आदेश दिले आहेत. १५ ते १८ वयोगटातील मुलांसाठी उद्यापासून (ता.३) लसीकरण सुरु केले जात आहे. दुसरीकडे संभाव्य तिसरी लाट व ओमिक्रॉनचे वाढते संकट लक्षात घेऊन या संदर्भात पूर्वतयारी सुरु आहे. वैद्यकीय उपचार, बेड्स आणि औषध व्यवस्था केली असल्याचे बोम्मई यांनी सांगितले.

मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले,‘‘कर्नाटक-मुंबई या दरम्यान खूप मोठे व्यापार संबंध आहेत. सीमावर्ती भागात नियमित प्रवाशांची ये-जा सुरु असते. आर्थिक उलाढालीसह व्यवसाय नियमित चालतो. या कारणांनी महाराष्ट्रातून कर्नाटकात येणाऱ्यांवर निर्बंध घातले आहे. ज्यांच्याकडे ७२ तासाच्या आतील आरटीपीसीआर (RTPCR Test) चाचणी आणि कोरोनाचे दोन डोस घेतल्याचे प्रमाणपत्र आहे. त्यांनाच प्रवेश देण्याबाबत आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत. चेकपोस्टवर काटेकोर तपासणीचे निर्देश आहेत. बेळगाव बरोबरच विजापूर जिल्ह्यातील चेकपोस्टबाबत असाच निर्णय घेण्यात आला आहे.’’

basavaraj bommai
कर्नाटकात प्रवेश करताय तर.. RTPCR बंधनकारक; तपासणी नाक्यावर बंदोबस्त

नाईट कर्फ्यू वाढबाबत २ दिवसांत निर्णय

ओमिक्रॉनच्या पार्श्‍वभूमीवर नाईट कर्फ्यू घोषित केले आहे. नाईट कर्फ्यू वाढबाबत दोन दिवसांत निर्णय घेण्यात येईल. कोरोना संसर्ग वाढतोय. त्याचा आढावा घेऊन निर्णय घेण्यात येईल. निर्बंध आणि नाईट कर्फ्यू जनतेच्या हितासाठी घेण्यात आल्याचेही मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com