LokSabha 2019 : मोदींना वारणसीतून आव्हान देणार तगडा उमेदवार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 मार्च 2019

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाराणसी मतदारसंघातून संघटनेचा एक तगडा उमेदवार देणार. आणि उमेदवार न मिळाल्यास स्वतःच मोदींच्या विरोधात निवडणूक लढविणार असल्याचे भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आजाद यांनी म्हटल आहे. या मतदार संघातून मोदींना हरवून त्यांना परत गुजरात मध्ये पाठविणार असल्याचेही आजाद म्हणाले.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाराणसी मतदारसंघातून संघटनेचा एक तगडा उमेदवार देणार. आणि उमेदवार न मिळाल्यास स्वतःच मोदींच्या विरोधात निवडणूक लढविणार असल्याचे भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आजाद यांनी म्हटल आहे. या मतदार संघातून मोदींना हरवून त्यांना परत गुजरात मध्ये पाठविणार असल्याचेही आजाद म्हणाले.

चंद्रशेखर आजाद सध्या मेरठ मधील एका रुग्णालयात उपचार घेत आहेत. या दरम्यान काँग्रेस पक्षाच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी आजाद यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली आणि तब्यतेची विचारपूस केली. परंतु, प्रियांका गांधी आणि चंद्रशेखर आजाद यांच्या भेटीमुळे उत्तर प्रदेशातील राजकिय क्षेत्रात चांगलीच खळबळ पसरली आहे. उत्तर प्रदेशातील सर्वच राजकिय पक्ष भीम आर्मी पासून दोन हात दुर रहात असताना या भेटीने नवीन राजकिय चर्चा सुरु झाली आहे. प्रियांका यांच्यासोबत ज्योतिरादित्य सिंधीया, राज बब्बर हे सुद्धा आजाद यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी रुग्णालयात आले होते.

प्रियंका गांधी म्हणाल्या, मोदी सरकार अहंकारी असून युवकांचा आजाव दाबण्याचा प्रयत्न करत आहे. युवकांची रोजगारा सोबतच अनेक प्रश्न सोडवून न शकणाऱ्या मोदी सरकार विरोधात युवक संघर्ष करत आहेत.

ही राजकिय भेट नसून केवळ तब्येतीची विचारपूस करण्यासाठी प्रियंका आल्या होत्या अस आजाद यांनी सांगितले. तर संघर्ष करणाऱ्या तरुणाची विचारपूस करण्यासाठी आले असल्याचे प्रियांका गांधी म्हणाल्या. 

भीम आर्मी संघठनेची पदयात्रा देवबंद येथून निघणार होती. परंतु, त्याला प्रशासनाने विरोध केला. या पदयात्रेमुळे आचारसंहितेचा भंग होत असून पदयात्रेसाठी प्रशासनाची परावणगी घेण्यात आली नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांचे अटक सत्र सुरु होते. परंतु, यासाठी योगी आदित्यनाथ जबाबदार असून त्यांनीच ही पदयात्रा रोखली असा आरोपही त्यांनी केला आहे. असे असले तीर आगामी लोकसभा निवडणुकीत भीम आर्मीचा मायावती यांना पूर्णपणे पाठिंबा राहिल. असेही आजाद यांनी स्पष्ट केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A strong candidate will be able to challenge Modi from Varanasi