हिजाब घातल्यानं विद्यार्थिनींना महाविद्यालयात प्रवेश नाकारला

Student denied college entry due to Hijab karnataka row
Student denied college entry due to Hijab karnataka rowesakal
Updated on

बंगळुरू : कर्नाटकात हिजाबवरून (Karnataka Hijab Row) सुरू असलेल्या घटना अद्यापही थांबलेल्या दिसत नाही. हिजाब घालून आलेल्या विद्यार्थिनींना कुंदापूर येथील भांडारकर महाविद्यालयाच्या (Bhandarkar College Kundapur) प्रवेशद्वारावर रोखण्यात आले. प्राचार्यांनी त्यांना महाविद्यालयात प्रवेश नाकारला.

Student denied college entry due to Hijab karnataka row
कर्नाटक: कॉलेजमध्ये हिजाब बंदीविरोधात हायकोर्टात याचिका

सरकारी आदेश आणि कॉलेजच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, विद्यार्थ्यांना गणवेशात वर्गात यावे लागेल. बुरखा किंवा हिजाब घालून तुम्हाला महाविद्यालयात येता येणार नाही, असं महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी विद्यार्थिनींना म्हटलं. पण, आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून हिजाब घालून महाविद्यालयात येत आहोत. त्यामुळे आम्हाला परवानगी दिली पाहिजे, असं विद्यार्थिनींनी म्हटलं. तरीही त्यांना प्रवेश नाकारण्यात आला.

भंडारकर महाविद्यालयाच्या प्रशासनाने बुधवारी भगवा दुपट्टा घेऊन येणाऱ्या विद्यार्थ्यांनाही परवानगी नाकारली होती. त्यानंतर विद्यार्थ्यांनी ‘जय श्री राम’च्या घोषणा दिल्याने कॅम्पसमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली.

दरम्यान, कर्नाटकचे गृहमंत्री अरगा ज्ञानेंद्र यांनी सांगितले की, राज्यातील हिजाब प्रकरणामागील जातीयवादी शक्तींचा तपास घेण्याचे निर्देश पोलिस विभागाला आधीच देण्यात आले आहेत. "तपास सुरू आहे. या देशाच्या एकात्मतेच्या आड येणाऱ्या घटकांना आम्ही सोडणार नाही. सर्व शाळा-महाविद्यालयांसाठी एकच नियम असेल. मी याबाबत जिल्हा आयुक्तांशी चर्चा करणार आहे. याबाबत शिक्षणमंत्री आणि मुख्यमंत्र्यांशीही चर्चा केली जाईल. मला सविस्तर माहिती मिळाल्यावर मी कारवाई करेन," असेही त्यांनी सांगितले.

"वर्गात नकाब, बुरखा, हिजाब, भगवा किंवा दुपट्टा वापरण्यास परवानगी नाही. गणवेश सक्तीचा असल्याचे शिक्षणमंत्र्यांनी आधीच सांगितले आहे. शैक्षणिक वातावरणात फूट पाडणारे कोणतेही घटक असू नयेत,'' असेही ते म्हणाले.

राज्य सरकारकडून समितीची स्थापना -

हिजाब परिधान केलेल्या विद्यार्थ्यांना वर्गात प्रवेश द्यायचा की नाही हे ठरवण्यासाठी राज्य सरकारने उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. अहवाल सादर होईपर्यंत सरकारने विद्यार्थ्यांना हिजाब न घालता गणवेशात वर्गात जाण्यास सांगितले आहे. मात्र, मुस्लिम विद्यार्थ्यांनी या आदेशाला बगल देत उडुपीच्या सरकारी गर्ल्स प्री-युनिव्हर्सिटी कॉलेजमध्ये हिजाब घालून वर्गात जाण्याचा प्रयत्न केला. त्यांना परत पाठवण्यात आले.

दरम्यान, मुस्लिम विद्यार्थी हिजाब घालून आल्यास हिंदू विद्यार्थी भगवा दुपट्टा वापरतील, असे हिंदू संघटनांनी म्हटले आहे. कॅम्पस फ्रंट ऑफ इंडिया (CFI), सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया (SDPI) ची विद्यार्थी शाखा, सत्ताधारी भाजप मुस्लिम महिलांना हिजाब घालण्याची परवानगी न देऊन त्यांच्या घटनात्मक अधिकारांवर गदा आणली जात असल्याचा आरोप केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com