
कोटा: राजस्थानमधील कोटा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. दहावीमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याचा अचानक हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. विशेष म्हणजे, हा विद्यार्थी मोबाईलवर अभ्यास करत असताना ही घटना घडली. अचानक त्याच्या तोंडून मोठा आवाज आला आणि तो थेट जमिनीवर कोसळला. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, हा मृत्यू हार्ट अटॅकमुळे झाला आहे.