शिक्षिकेनं विद्यार्थिनीला पहिल्या मजल्यावरुन दिलं ढकलून!; पोलिसांनी घेतलं ताब्यात : Student Pushed Off First Floor | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Delhi School

Student Pushed Off First Floor: शिक्षिकेनं विद्यार्थिनीला पहिल्या मजल्यावरुन दिलं ढकलून!; पोलिसांनी घेतलं ताब्यात

नवी दिल्ली : पाचवीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीला शाळेच्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरुन शिक्षिकेनंच ढकलून दिल्याचा धक्कादायक प्रकार दिल्लीत घडला आहे. या घटनेत संबंधित विद्यार्थिनी जखमी झाली असून तिच्यावर बारा हिंदू राव हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. याप्रकरणी शिक्षिकेला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. (Student pushed off first floor by teacher at Delhi school)

हेही वाचा: Maiden Pharma Cough Syrups: देशाची प्रतिमा मलिन केल्यानं भारतानं WHOला खडसावलं!

दिल्लीच्या फिल्मिस्तान भागातील मॉडेल बस्ती भागातल्या प्राथमिक विद्यालयात शुक्रवारी हा प्रकार घडला. गीता देशवाल नावाच्या शिक्षिकेनं हे कृत्य केलं आहे. या शिक्षिकेनं पाचवीत शिकणाऱ्या १० वर्षीय विद्यार्थिनीला कात्रीनं मारहाण करत तिला शाळेच्या पहिल्या मजल्यावरुन खाली ढकलून दिलं, अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिली.

हे ही वाचा : काय आहे सलाम किंवा कुर्निसाताचे महत्त्व राजशिष्टाचारांमध्ये

या घटनेत गंभीर जखमी झालेल्या विद्यार्थिनीवर बारा हिंदू राव हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. याप्रकरणी भदंवि कलम ३०७ अंतर्गत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.