
कर्नाटकात हिजाब वाद सुरुच; विद्यार्थ्यांचा परीक्षेवर बहिष्कार!
हिजाब प्रकरणावर आज कर्नाटक उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने निकाल दिला आहे. शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब वापरणे आवश्यक नाही. हिजाब हा शालेय गणवेशाचा भाग असू शकत नाही, असा निर्णय उच्च न्यायालयाने दिला. या निकालाला विरोध करत कर्नाटकमध्ये मुलांनी परीक्षेवर बहिष्कार टाकलाय.
कर्नाटक उच्च न्यायालयाने हिजाब प्रकरणावर निकाल दिल्यानंतर अवघ्या काही तासांनंतर, कर्नाटकातील यादगीर येथील विद्यार्थ्यांनी परीक्षेवर बहिष्कार टाकला. विद्यार्थ्यांना कर्नाटक उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले होते पण त्यांनी नकार दिला आणि परीक्षा हॉलमधून बाहेर पडले. एकूण ३५ विद्यार्थी कॉलेजमधून बाहेर पडले, अशी माहिती समोर आली आहे.
हेही वाचा: RBI ने 8 बँकांना ठोठावला मोठा दंड, महाराष्ट्रातील तीन बँकांचा समावेश
27 डिसेंबर 2021 रोजी कर्नाटकातील उडुपी जिल्ह्यातील कुंदापूर येथील सरकारी कनिष्ठ महाविद्यालयात हिजाबवरून वाद सुरू झाला. हिजाब घालून आलेल्या मुस्लीम विद्यार्थिनींना (Muslim Students) महाविद्यालयात प्रवेश नाकारण्यात आला. कर्नाटक राज्य सरकारनं (Karnataka Government) जारी केलेल्या ड्रेस कोडबाबतच्या नियमानुसार हिजाब परिधान करण्यास परवानगी दिली जाणार नाही, असा कडक आदेश महाविद्यालयीन अधिकाऱ्यांनी देऊनही काही मुस्लीम विद्यार्थिनी आपल्या पालकांसह महाविद्यालयात आल्या असता, त्यांना महाविद्यालयीन परिसराच्या बाहेर उभं करण्यात आलं. त्यामुळं मुलींसह त्यांच्या पालकांनीही गेटबाहेर निदर्शनं केली.
हेही वाचा: 'हायकोर्टाच्या आदेशाने मुलांना अल्लाह अन् शिक्षण...' हिजाब निकालानंतर ओवैसी आक्रमक
या मुलींचा निषेध करण्यासाठी काही हिंदू विद्यार्थी भगवे उपरणे घालून महाविद्यालयाच्या परिसरात फिरत होते. त्यामुळं हा विषय अधिकच चिघळला होता. या प्रकरणी कर्नाटक उच्च न्यायालयात हिजाब बंदीविरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. हिजाब घालून वर्गात येण्यापासून मुस्लीम विद्यार्थिनींना रोखल्यानंतर हा वाद सुरू झाला.
Web Title: Students From Karnataka Boycott Exam Over High Court Judgment On Hijab Case
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..