esakal | भारतीयांची सरासरी उंची घटलीय, संशोधनातून समोर आलं वास्तव
sakal

बोलून बातमी शोधा

height

भारतीयांची सरासरी उंची घटलीय, संशोधनातून समोर आलं वास्तव

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली : गेल्या काही वर्षांपासून जगभरातील नागरिकांची उंची (height) वाढत आहे. मात्र, भारतीयांच्या उंचीमध्ये (Indian height decline) घट होत असल्याने खळबळ निर्माण झाली आहे. २००५ ते २०१५ते१६ मध्ये देशातील महिला व पुरुषांची सरासरी उंची घटली आहे. यामध्ये आदिवासी समाजासोबतच गरीब कुटुंबातील महिलांची उंची मोठ्या प्रमाणावर कमी झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. मात्र, असं का घडतंय? हे देखील महत्वाचे आहे.

हेही वाचा: ऐकावं ते नवलच! कुतुब मिनारची उंची होतेय कमी; जाणून घ्या कारण

राष्ट्रीय कौटुंबीक आरोग्य सर्व्हेच्या आकेडवारीच्या आधारावर हा अभ्यास केला आहे. यामध्ये १५ ते २५ आणि २६ ते ५० वयोगटातील महिला आणि पुरुषांचा अभ्यास करण्यात आला आहे. यामध्ये भारतातील नागरिकांचा सर्व्हे वाईट असल्याचे दिसून आला. उंची पोषण तसेच सार्वजनिक आरोग्याच्या सर्वात मूलभूत निर्देशकांपैकी एक आहे आणि ती थेट देशाच्या एकूण जीवनमानाशी जोडलेली आहे. हे जात आणि उत्पन्न यांसारख्या सामाजिक आणि आर्थिक घटकांना देखील प्रभावित करते. सरासरी उंची कमी होणे म्हणजे भारत सार्वजनिक आरोग्य तसेच आर्थिक उद्दिष्टांवर मागे पडत असल्याचे दिसून येते. जगभरात सरासरी उंचीच्या एकूण वाढीच्या संदर्भात भारतातील प्रौढांची सरासरी उंची कमी होणे चिंताजनक आहे. यावर गांभीर्याने विचार करण्याची गरज असल्याचेही संशोधनामध्ये म्हटले आहे.

भारतात 1998 ते 2015 पर्यंत प्रौढांच्या उंची -

जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील सामाजिक चिकित्सा आणि सामुदायिक आरोग्य केंद्रातील कृष्णा कुमार चौधरी, सायन दास आणि प्रचिनकुमार घोडाजकर यांनी नॅशनल फॅमिली हेल्थ सर्विसच्या तिन्ही सर्व्हेचा अभ्यास केला. यामध्ये भारतीयांच्या उंचीमध्ये फरक दिसून आला. राष्ट्रीय कौटुंबीक आरोग्य धोरण हे केंद्र सरकारच्या कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून राबविले जाते. त्यामुळे भारतातील सार्वजनिक आरोग्याचा अभ्यास करण्यासाठी हे एक महत्वाचा स्त्रोत आहे. त्यांनी संशोधकांना असे आढळून आले की NFHS-III (2005-’06) आणि NFHS-IV (2015-’16) दरम्यान, 15-50 वयोगटातील भारतीयांच्या (२६ ते ५० वयोगटातील महिला वगळून) उंचीमध्ये घट दिसली. 15-25 दरम्यान स्त्रियांच्या ०.१२ सेमीने घट झाली, २६-५० वयोगटातील महिलांमध्ये ०.१३ ने वाढ झाल्याचे दिसून आले. याच कालावधीत, 15-25 च्या दरम्यानच्या पुरुषांनी त्यांच्या सरासरी उंचीमध्ये 1.10 सेंटीमीटरची घट दिसून आली, तर 26-50 वर्ष वयोगटातील नागरिकांमध्ये 0.86 सेमी घट झाली.

हे सर्वेक्षण का महत्वाचं आहे?

उंचीवर आनुवंशिकतेचा प्रभाव असला तरी पोषण आणि पर्यावरणासारखे गैर-अनुवांशिक घटक देखील महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. घरगुती वैशिष्ट्ये (जसे की भावंडांची संख्या आणि वर्ग) आणि जातीचा बदल एखाद्या व्यक्तीच्या पोषण आणि वाढीवर होतो. उंचीचा संबंध हा संपत्तीसोबत देखील आहे. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या लोकांची सरासरी उंची ही इतर मागासवर्गीय आणि उच्च जातीच्या लोकांपेक्षा कमी आहे. उंचीचा फरक त्या व्यक्तीच्या कामावर देखील होतो. कुपोषित नागरिकांमुळे भारत दरवर्षी आपल्या सकल देशांतर्गत उत्पादनापैकी सुमारे 4 टक्के गमावतो, असेही अभ्यासातून समोर आले आहे. त्यामुळे या सर्वेक्षणाचा गांभीर्याने विचार होणे गरजेचे आहे.

loading image
go to top