subrata roy wife swapna roy and son sushanto roy macedonian citizenship sahara shree passed away
subrata roy wife swapna roy and son sushanto roy macedonian citizenship sahara shree passed away

Subrata Roy Death : सुब्रत रॉय यांच्या पत्नी अन् मुलाने घेतलं दुसऱ्या देशाचं नागरिकत्व; कारण काय? जाणून घ्या

सहारा श्री म्हणून प्रसिद्ध सुब्रत रॉय यांचं मुंबईतील रुग्णालयात काल निधन झालं. ते मागच्या काही दिवसांपासून आजारी होते. सुब्रत रॉय यांचा समावेश देशातील टॉपच्या उद्योगपतींमध्ये होतो. सुब्रत रॉय यांनी भारतात सहारा इंडिया ग्रूपची स्थापना केली होती. त्यांच्या निधनाने राजकीय तसेच चित्रपट क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी देखील दुखः व्यक्त केलं आहे.

खूप कमी लोकांना सुब्रत रॉय यांची पत्नी स्वप्ना रॉय आणि मुलगा सुशांतो रॉय यांनी भारतीय नागरिकत्व सोडून बाल्कन देश मॅसेडोनियाचे नागरिकत्व घेतल्याबद्दल माहित आहे. भारतीय कायद्यांपासून संरक्षण मिळवण्याकरिता त्यांनी हा निर्णय घेतला होता. सुब्रत रॉय यांच्या विरोधात पैसे परत न केल्यावरून अनेक केसेस सुरू होत्या. त्यामुळे त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी दुसऱ्या देशाची नागरिकत्व घेऊन स्वतःला भारतीय कायद्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला.

subrata roy wife swapna roy and son sushanto roy macedonian citizenship sahara shree passed away
Subrata Roy Biopic: सहारा ग्रुपचे संस्थापक सुब्रत रॉय यांच्या बायोपीकची घोषणा, वाचा सविस्तर

मॅसेडोनियाचे नागरिकत्व कसं मिळतं?

मॅसेडोनिया हा दक्षिण पूर्व युरोपमधील एक देश आहे. हा एक नवीन देश असून येथे लोकांना गुंतवणुकीसाठी नागरिकत्व दिलं जातं. रिपोर्टनुसार, मॅसेडोनियन नागरिकत्व मिळवू इच्छिणाऱ्या कोणत्याही नागरिकाला फक्त 4 लाख युरोची गुंतवणूक जाहीर करावी लागते आणि 10 स्थानिक लोकांना काम द्यावे लागते. असे केल्याने त्याला मॅसेडोनियनचे नागरिकत्व सहज मिळू शकते. याशिवाय, मॅसेडोनियामध्ये रिअल इस्टेटमध्ये 40 हजार युरोपेक्षा जास्त गुंतवणूक करणाऱ्या परदेशी व्यक्तीला एक वर्ष राहण्याचा अधिकार मिळतो. मॅसेडोनिया आपल्या देशातील बेरोजगारीचा दर कमी करण्यासाठी हे करत आहे. मॅसेडोनियामध्ये बेरोजगारांची संख्या खूप जास्त आहे.

subrata roy wife swapna roy and son sushanto roy macedonian citizenship sahara shree passed away
Subrata Roy: सहारा इंडियाचे प्रमुख सुब्रत रॉय यांच्या निधनानंतर गुंतवणूकदारांचे पैसे बुडणार का?

रिपोर्ट्सनुसार सुब्रत रॉय यांच्या सहाराचे मॅसेडोनियासोबत चांगले संबंध होते. ते मॅसेडोनियाचे राजकीय पाहुणे देखील राहिले आहेत. मॅसेडोनियामध्ये मदर तेरेसा यांचा मोठा पुतळा बसवण्याचा प्रस्तावही त्यांनी मांडला होता. तेथे कॅसिनो बांधण्याचा प्रस्तावही त्यांनी मांडला. मॅसेडोनिया पूर्वी युगोस्लाव्हियाचा भाग होता. डो नंतर 1991 मध्ये स्वतंत्र झाला आणि 1993 मध्ये संयुक्त राष्ट्रांचे सदस्य बनला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com