

Sharifa Kalthingal
esakal
Woman Entrepreneur: मोठे स्वप्न बघण्यासाठी पैसाही तसाच लागतो, हा समज एका महिलेने खोडून काढला आहे. केरळच्या मलप्पुरम जिल्ह्यातल्या शरिफा कलथिंगल या महिलेची ही सक्सेस स्टोरी आहे. तुमचे हेतू कणखर असतील तर शंभर रुपयेसुद्धा तुमचं नशीब बदलवू शकतात. ज्या महिलेच्या घरात फुटकी कवडी नव्हती ती महिला आज कोट्यवधी रुपयांच्या मलमत्तेची मालकीण बनील आहे. शरिफा यांनी शंभर रुपयांचं कर्ज घेऊन रोट्या विकल्या होत्या. हीच महिला आज दोन रेस्टॉरंटची मालकीण झाली आहे.