
उत्तराखंडमधील चमोलीतील तपोवन येथील ऊर्जा प्रकल्पाच्या बोगद्यामध्ये अडकून पडलेल्या कामगारांचा शोध घेणाऱ्या पथकाच्या आशा पुन्हा एकदा पल्लवीत झाल्या आहेत. ज्या बोगद्यामध्ये हे कामगार अडकून पडले आहेत त्याला लागूनच दुसरा एक बोगदा असून तिथे ड्रिलिंग करण्यामध्ये शोध पथकांना यश आले आहे.
डेहराडून - उत्तराखंडमधील चमोलीतील तपोवन येथील ऊर्जा प्रकल्पाच्या बोगद्यामध्ये अडकून पडलेल्या कामगारांचा शोध घेणाऱ्या पथकाच्या आशा पुन्हा एकदा पल्लवीत झाल्या आहेत. ज्या बोगद्यामध्ये हे कामगार अडकून पडले आहेत त्याला लागूनच दुसरा एक बोगदा असून तिथे ड्रिलिंग करण्यामध्ये शोध पथकांना यश आले आहे. गुरुवारी मध्येच खडकाचा अडथळा आल्याने येथील ड्रिलिंग थांबविण्यात आले होते. दरम्यान याच बचाव पथकाला अद्याप आतमध्ये कॅमेरा सोडता आलेला नाही. ऋषीगंगा नदीवर पाण्यातून मोठा राडारोडा वाहून आला होता, यामुळे एक कृत्रिम तलाव निर्माण झाल्याने तपासयंत्रणेसमोर नवी आव्हाने उभी ठाकली आहेत.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
६४ कामगार बेपत्ता
या घटनेत उत्तरप्रदेशातील आणखी ६४ कामगार बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. १३ फेब्रुवारी रोजी येथील जलआपत्तीमध्ये यूपीतील ४ कामगारांचा मृत्यू झाला असून त्यांचे मृतदेह देखील बचाव पथकाच्या हाती लागले आहेत. २३ जण यातून बचावले असले तरीसुद्धा आणखी ६४ जण बेपत्ता असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
Edited By - Prashant Patil