
नवी दिल्ली : एखाद्या मोटारीच्या चालकाने महामार्गावर गाडी चालवीत असताना कोणतीही पूर्वसूचना न देता वाहनास अचानक ब्रेक लावला आणि त्यामुळे जर अपघात घडला तर संबंधित चालकावर निष्काळजीपणाचा ठपका ठेवला जाऊ शकतो, असा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने आज दिला. न्या. सुधांशू धुलिया आणि न्या. अरविंद कुमार यांच्या पीठासमोर या प्रकरणी सुनावणी पार पडली.