West Bengal: लोकशाही ही 'वैयक्तिक' नियमानुसार नाही तर...: राज्यपालांनी ममतांना खडसावले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सुदीप बंदोपाध्याय
West Bengal: लोकशाही ही 'वैयक्तिक' नियमानुसार नाही तर...: राज्यपालांनी ममतांना खडसावले

लोकशाही ही 'वैयक्तिक' नियमानुसार नाही तर...: राज्यपालांनी ममतांना खडसावले

नवी दिल्ली : पश्चिम बंगाल मध्ये उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू उपस्थित असताना राज्यपाल जगदीप धानकर यांची गरज नसून त्यांना काढण्यात यावे अशी मागणी आपण राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे केली आहे असं तृणमूल कॉंग्रेसचे खासदार सुदीप बंदोपाध्याय यांनी म्हटलं आहे. (West Bengal News)

पश्चिम बंगालच्या राज्यपालाने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना काल कायद्याच्या नियमावरुन खडसावल्याने हा वाद निर्माण झाल्याचं समजतंय. ''संसदीय कामात अडथळा निर्माण होतो म्हणून मी राष्ट्रपतींकडे पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धानकर यांना काढून टाकण्याची मागणी केली आहे.'' असं बंदोपाध्याय बोलताना म्हणाले.

हेही वाचा: २०१६ पासून देशात 60 हजार नवे स्टार्टअप; 6 लाख रोजगार-राष्ट्रपती कोविंद

तसंच राष्ट्रपतींच्या संसदेतील अर्थसंकल्पाविषयीच्या भाषणावर विचारले असता ते म्हणाले की, ''राष्ट्रपतींचं अभिभाषण हे नेहमी राज्यपालांच्या दृष्टीकोनातून प्रतित झालेलं असतं.''

लोकशाही ही 'वैयक्तिक' नियययमानुसार नाही तर कायद्याच्या नियमानुसार चालते असं पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धानकर हे रविवारी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना बोलताना म्हणाले होते. ''लोकशाही कायद्याच्या नियमानुसार चालते वैयक्तिक नियमानुसार नाही, मी आशा करतो की त्या याकडे लक्ष देतील. तसेच त्यांना राज्यपालाशी संवाद साधण्याचा अधिकारही संविधानाने दिला आहे.'' अस राज्यपाल बोलताना म्हणाले.

त्यानंतर पश्चिम बंगालमधील तृणमूल कॉंग्रेसचे खासदार सुदीप बंदोपाध्याय यांनी राष्ट्रपतींकडे उपराष्ट्रपती असताना राज्यपाल जगदीप धानकर यांची गरज नाही असं म्हणत त्यांना काढून टाकण्याची मागणी केली होती.

Web Title: Sudeep Bandopadhyay Remove Governer President

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Mamata Banerjeepresident
go to top