Sahitya Akademi Award 2024 : रसाळ, थळी यांना साहित्य अकादमी सन्मान, समीक्षा अन् निबंध साहित्य प्रकाराचा गौरव

Sahitya Akademi Award 2024 : सुधीर रसाळ यांना मराठीतील साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला असून, कोकणी निबंधासाठी मुकेश थळी यांना हा सन्मान मिळणार आहे. २१ भाषांसाठी पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.
Sahitya Akademi Award 2024
Sahitya Akademi Award 2024 Sakal
Updated on

नवी दिल्ली : मराठीतील नामवंत समीक्षक सुधीर रसाळ यांना आज साहित्य क्षेत्रातील प्रतिष्ठेचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. तर, कोकणी भाषेतील निबंध साहित्य प्रकारासाठी मुकेश थळी यांना या पुरस्काराने गौरविले जाणार आहे. मराठी, कोकणीसह २१ भाषांसाठी २०२४ या वर्षासाठीच्या साहित्य पुरस्कारांची घोषणा अकादमीतर्फे करण्यात आली. बांगला, डोगरी आणि उर्दू या तीन भाषांमधील पुरस्कार विजेत्यांची नावे साहित्य अकादमीतर्फे नंतर जाहीर करण्यात येतील.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com