
नवी दिल्ली : ‘‘यंदाच्या वर्षात (२०२४-२५) ऊस गाळप हंगामाचा कालावधी घटला आहे. महाराष्ट्रातील गाळप हंगाम १४० ते १५० दिवस चालणे अपेक्षित असताना तो केवळ ८३ दिवस चालला आहे आणि साखर उत्पादन केवळ ८० लाख टन झाले असल्याने साखर उद्योग आर्थिक अडचणीत आला आहे,’’ अशी चिंता राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केली आहे.