Sugar Stock Limits: साखरेच्या साठवणुकीवर केंद्राचे निर्बंध; सणासुदीच्या पार्श्वभूमीवर निर्णय; पंधरा दिवसच साठा ठेवता येणार

Sugar Stock Limits, Central Government Rules, Sugar Supply: सणासुदीच्या काळात साखरेच्या साठेबाजीला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने १५ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत व्यापाऱ्यांच्या साठवणुकीवर निर्बंध घातले आहेत.
Centre caps sugar stocks at 1,000 quintals for traders to curb hoarding during the festive season.

Centre caps sugar stocks at 1,000 quintals for traders to curb hoarding during the festive season.

esakal

Updated on: 

नवी दिल्ली: सणासुदीच्या काळात होणारी साखरेच्या साठेबाजीला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने व्यापाऱ्यांच्या साठवणुकीवर मर्यादा घातली आहे. व्यापाऱ्यांना साखरेचा साठा मिळाल्यानंतर पंधरा दिवसांपेक्षा अधिक काळ तो स्वतःकडे ठेवता येणार नाही. तसेच, देशभरात कोणत्याही वेळी व्यापाऱ्यांना एक हजार क्विंटलपेक्षा अधिक साखरेचा साठा करता येणार नाही. हे सुधारित नियम १५ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत लागू राहतील.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com