Suicide Prevention Day : देशातील पुरुष तरुणांमध्ये वाढते आत्महत्येचे प्रमाण !

suicide prevention
suicide preventionsakal

Suicide Prevention Day : जगभरात आत्महत्या हा एक गंभीर प्रश्न आहे. या गंभीर समस्येबद्दल लोकांना जागरूक करण्यासाठी दर वर्षी १० सप्टेंबर रोजी जागतिक ‘आत्महत्या प्रतिबंध दिन’ साजरा केला जातो. यानिमित्ताने ‘इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पॉप्युलेशन सायन्सेस’ (आयआयपीएस) या संस्थेने केलेल्या अभ्यासात तरुण पुरुषांच्या आत्महत्येत वाढ झाल्याची बाब समोर आली आहे.

१८ ते २९ वर्षे वयोगटातील तरुण पुरुषांनी आत्महत्या करण्याचे प्रमाण १३७ टक्क्यांनी वाढल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

suicide prevention
SAKAL Ganesha Workshop: शाडू मातीपासून बाप्पा साकारा! शनिवारी ‘सकाळ NIE'तर्फे कार्यशाळा

मुंबईतील इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पॉप्युलेशन सायन्सेस संस्थेने अमेरिकेतील आघाडीच्या विद्यापीठांतील लेखकांच्या सहकार्याने हा अभ्यास केला. यात विद्यार्थी, पदवीधर आणि नवविवाहित जोडप्यांचा समावेश करण्यात आला.

हा अभ्यास भारतातील आत्महत्येमुळे होणाऱ्या मृत्यूच्या बदलत्या पद्धतींवर करण्यात आला आहे. लॅन्सेट जनरलमध्ये नुकताच हा अभ्यास प्रकाशित झाला.

suicide prevention
Mumbai News : रुक्मिणीबाई रुग्णालयाच्या दारातच महिलेची प्रसुती,पोलिस,नागरिकांनी विनवणी करुनही...

याबाबत माहिती देताना ‘आयआयपीएस’चे डॉ. सूर्यकांत यादव म्हणाले की, या अभ्यासात अनेक आश्‍चर्यकारक निष्कर्ष समोर आले आहेत. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो, नॅशनल सॅम्पल सर्व्हे आणि भारतीय जनगणनेच्या आधारे हा निष्कर्ष काढण्यात आला. यासाठी दीड वर्षे कालावधी लागला. या निष्कर्षात असे आढळून आले की २०१४ च्या तुलनेत २०२१ मध्ये १८ ते २९ वयोगटातील पुरुषांच्या आत्महत्येच्या घटनांमध्ये १३७ टक्क्यांनी वाढ झाली आहे; तर ३० ते ४५ वयोगटातील पुरुष वर्गात १३१ टक्के वाढ दिसून आली आहे; तर पुरुष कामगारवर्गातील आत्महत्येचे प्रमाण २७० टक्क्यांनी वाढले आहे.

suicide prevention
Mumbai local Viral Video : मुंबईकरांचं कौतुक करू तितकं कमी ; तुम्ही हा व्हीडिओ बघितला आहे का ?

आर्थिक परिस्थिती आणि कौटुंबिक समस्या ही आत्महत्येची प्रमुख कारणे असल्याचे डॉ. सूर्यकांत यांनी सांगितले. १८ ते २९ वयोगटात विशेषत: सुशिक्षित, विद्यार्थी आणि नवविवाहित लोकांचा समावेश आहे; तर ३० ते ४५ या वयोगटात नोकरदार, मजूर आणि विवाहित लोकांचा समावेश आहे. नवविवाहित तरुणांमध्ये कुटुंबाचा भार आणि नवीन नाती जपण्याची जबाबदारी अधिक असते; तर विद्यार्थ्यांवर अभ्यासाचा ताण अधिक असतो, असे त्यांनी सांगितले. अशा परिस्थितीत बिकट आर्थिक परिस्थिती त्यांना आणखी नैराश्यात टाकते. त्यामुळे त्यांच्याकडे आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय उरत नाही.

suicide prevention
Mumbai News : सीआयएसएफ जवानाची चोरी झालेली बंदुकीची मॅगझीन शोधण्यात पोलिसांना यश; तीन संशयीत ताब्यात

२०१४ मध्ये पुरुष कामगार वर्गामध्ये १३,९४४ आत्महत्येची प्रकरणे होती, जी २०२१ मध्ये वाढून ३७,७५१ झाली. हीच परिस्थिती १८ ते २९ वयोगटातील पुरुषांमध्येही दिसून आली आहे. सन २०१४ मध्ये या वर्गातील २७,३४३ पुरुषांनी आत्महत्या केल्या होत्या, जी संख्या २०२१ मध्ये ३७,९४१ पर्यंत वाढले. याशिवाय २०१४ मध्ये ३० ते ४५ वयोगटातील ३०,६५९ पुरुषांनी आत्महत्या केल्या होत्या, ज्या २०२१ मध्ये वाढून ४०,४१५ झाल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com