
नवी दिल्ली : मराठी प्रशासकीय अधिकारी व क्रीडा मंत्रालयाच्या सचिव सुजाता चतुर्वेदी यांची केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (युपीएससी) सदस्यपदी नियुक्ती झाली. सुजाता चतुर्वेदी या ३० जूनला सेवानिवृत्ती होणार आहेत. तत्पूर्वी, केंद्र सरकारच्या शिफारशीनुसार राष्ट्रपतींनी त्यांची केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या सदस्यपदी नेमणूक केली आहे.