
सुली डील्सचा मास्टरमाइंड ओंकारेश्वर ठाकूर याला इंदौरमधून अटक
सुली डील्स (Sulli Deals) अॅपचा निर्माता आणि मास्टरमाइंड ओंकारेश्वर ठाकूर (Aumkareshwar Thakur) याला मध्य प्रदेशातील इंदौर येथून अटक करण्यात आली आहे . दिल्ली पोलिसांनी ही माहिती दिली असून मुस्लिम महिलांना ट्रोल करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ट्विटरवरील ट्रेड ग्रुपचा तो सदस्य होता.
दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलमधील इंटेलिजेंस फ्यूजन आणि स्ट्रॅटेजिक ऑपरेशनचे डीसीपी केपीएस मल्होत्रा यांनी सांगितले की, सुली डील्स अॅपचा निर्माता ओंकारेश्वर ठाकूर याला इंदूरमधून अटक करण्यात आली आहे. आरोपी ओंकारेश्वर ठाकूर हा इंदूर येथील न्यूयॉर्क सिटी टाऊनशिपचा रहिवासी आहे. आरोपीने इंदूरमधील आयपीएस अकादमी या मोठ्या संस्थेतून बीसीए केले आहे. (sulli deals mastermind aumkareshwar thakur arrested)
आरोपीच्या चौकशीत
काही मिडीया रिपोर्टनुसार , प्राथमिक चौकशीदरम्यान, त्याने कबूल केले होते की तो ट्विटरवरील ट्रेड-ग्रुपचा सदस्य होता आणि विशिष्ट धर्माच्या महिलांना बदनाम करण्याचा आणि ट्रोल करण्याचा त्याचा हेतू होता. यासाठी त्यांनी गिटहबवर एक कोड डेव्हलप केला. ज्याचा GitHub वरील ग्रुपमधील सर्व सदस्यांना एक्सेस होता. त्याने आपल्या ट्विटर अकाउंटवर अॅपची लिंक शेअर केली आहे. मुस्लिम महिलांची बदनामी करण्याच्या उद्देशाने ग्रुपमधील सदस्यांनी त्यांचे फोटो अपलोड केले होते.दरम्यान या प्रकरणात आरोपींची चौकशी सुरू आहे.
हेही वाचा: Jio चा सगळ्यात स्वस्त प्लॅन, 400 पेक्षा कमीत 84 दिवस व्हॅलिडिटी
आणखी नावे समोर येण्याची शक्यता
दिल्ली पोलिसांनी आरोपी ओंकारेश्वरला आपल्यासोबत दिल्लीत आणले आहे. असे मानले जात आहे की, SulliDeals या अॅपचा निर्माता आणि मास्टरमाईंड ओंकारेश्वर ठाकूरची चौकशी केल्यानंतर आणखी काही नावे समोर येऊ शकतात. 25 वर्षीय ओंकारेश्वर ठाकूरने जुलै 2021 मध्ये गिटहबवर सुली डील्स अॅप तयार केल्याची कबुली पोलिसांना दिली. अनेक मुस्लिम महिलांचे फोटो त्यांच्या परवानगीशिवाय अॅपद्वारे लिलावासाठी अपलोड करण्यात आले होते. ओंकारेश्वर ठाकूरने चौकशीदरम्यान सांगितले की, तो जानेवारी 2020 मध्ये @gangescion या ट्विटर हँडलचा वापर करून ट्विटरवरील TradeMahasabha नावाच्या ग्रुपमध्ये सामील झाला होता. यानंतर सदस्यांनी चर्चा करून मुस्लिम महिलांना ट्रोल करण्याचा कट रचला. प्रकरण चिघळल्यानंतर त्या सर्व लोकांनी त्यांचे सर्व सोशल मीडिया फुटप्रिंट डिलीट केले होते.
हेही वाचा: Tata घेऊन येतेय स्वस्तात मस्त सीएनजी कार, काय असतील फीचर्स?
नेमका प्रकार काय होता?
Sulli Deals मध्ये मुस्लीम महिलांच्या सोशल नेटवर्किंग प्रोफाईलवरून त्यांचे फोटो चोरून त्यांचा वापर या sulli bai अॅप्लिकेशनमध्ये केला जात होता. अशा शेकडो महिलांचे फोटो या अॅपवर लिलावासाठी अपलोड करण्यात आले होते. सोशल नेटवर्किंग प्रोफाईलवरून त्यांचे फोटो चोरून त्यांचा वापर केला जात होता. त्यांचे फोटो आक्षेपार्ह पद्धतीने वापरून त्यांचा लिलाव या मोबाईल अॅप्लिकेशनवर केला जात होता
Web Title: Sulli Deals Mastermind Aumkareshwar Thakur Arrested From Indore By Delhi Police
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..