Super Vasuki : भारतीय रेल्वेची ३.५ किमी लांबीची ट्रेन, यात आहेत २९५ वॅगन्स | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Super Vasuki freight train

Super Vasuki : भारतीय रेल्वेची ३.५ किमी लांबीची ट्रेन, यात आहेत २९५ वॅगन्स

भारतीय रेल्वेच्या दक्षिण पूर्व मध्य रेल्वे (SECR) ने भारताच्या 76 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त 295 लोड केलेल्या वॅगन्ससह सुपर वासुकी मालवाहू ट्रेन (Super Vasuki freight train) चालवण्यात आली. 15 ऑगस्ट रोजी सरकारच्या 'आझादी का अमृत महोत्सव' या उपक्रमाचा एक भाग म्हणून भारतीय रेल्वेने चालवलेली ही सर्वात लांब आणि सर्वात वजनदार मालवाहू ट्रेन आहे. सुपर वासुकी ही 3.5 किमी लांबीची ट्रेन असून ज्यामध्ये 295 लोडेड वॅगन्समध्ये अंदाजे 27,000 टन भार वाहून नेण्यात आला.

देशात स्वातंत्र्याचा अमृतमोहत्सव साजरा केला जात आहे. यानिमीत्ताने भारतीय रेल्वेने 'अमृत ​​काल' सुरुवात म्हणून तसेच, 'आझादी का अमृत महोत्सव' उत्सवाचा एक भाग म्हणून 15 ऑगस्ट 2022 रोजी सुपर वासुकी ही लांब पल्ल्याची मालवाहू रेल्वे चालवली. यामध्ये 27,000 टन वजनाच्या 295 वॅगन्स असून ही रेल्वे 3.5-किमी-लांबीची आहे.

सुपर वासुकीने 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाच्या उत्सवाचा एक भाग म्हणून छत्तीसगडमधील कोरबा येथून कोळसा नागपुरातील राजनांदगाव येथे नेला. या ट्रेनने 13:50 वाजता कोरबा सोडले आणि 267 किमी अंतर कापण्यासाठी 11.20 तास लागले. ट्रेन तयार करण्यासाठी पाच मालगाड्या एका रेकमध्ये एकत्र केल्या गेल्या आहेतय

मालवाहतूक ट्रेनला देण्यात आलेले त्याचे नाव हे वासुकी या हिंदू सर्पांच्या देवतेवरून मिळाले आहे. भगवान शिवाचा साप, वासुकी हा महादेवाच्या गळ्याभोवती असल्याचे सांगितले जाते. तसेच या नागाच्या डोक्यावर एक रत्न असून त्याला नागमणी म्हटले जाते. दरम्यान असा दावा केला जात आहे की रेल्वेने चालवलेली ही सर्वात लांब आणि वजनदार मालगाडी आहे आणि ती सुमारे चार मिनिटांत एक स्टेशन ओलांडते.

अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार, सुपर वासुकीमध्ये 3000 मेगावॅटचा वीज प्रकल्प पूर्ण दिवस चालवण्यासाठी पुरेसा कोळसा आहे. तसेच आता वापरात असलेल्या 90-कार, 100-टन रेल्वे रेकच्या तुलनेत हे एका ट्रिपमध्ये तिप्पट कोळसा वाहतूक करू शकते.

पॉवर प्लांट्ससाठी इंधनाचा तुटवडा टाळण्यासाठी, अशा रेल्वेंचा वापर वाढवण्याचा रेल्वेचा विचार आहे, विशेषतः जास्त मागणीच्या काळात कोळशाची वाहतूक करण्यासाठी अशा रेल्वे गाड्या वापरण्यात येतील. याआधी 2022 मध्ये संपूर्ण देशात कोळशाच्या कमतरतेमुळे विजेचे मोठे संकट निर्माण झाले होते.

Web Title: Super Vasuki Indian Railways 35 Km Long Train With 295 Wagons

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..