Noida : सुपरटेकचे ट्विन टॉवर 28 ऑगस्टला पाडण्यात येणार; सर्वोच्च न्यायालयाकडून मंजुरी

यापूर्वी टॉवर पाडण्यास सीबीआरआयनंही मान्यता दिलीय.
Supertech Emerald Court Twin Towers
Supertech Emerald Court Twin Towersesakal
Updated on
Summary

यापूर्वी टॉवर पाडण्यास सीबीआरआयनंही मान्यता दिलीय.

नोएडा (Noida) येथील सेक्टर-93 ए सुपरटेक एमराल्ड कोर्ट ट्विन टॉवर्स (Supertech Emerald Court Twin Towers) पाडण्यास सर्वोच्च न्यायालयानं (Supreme Court) मंजुरी दिलीय. 28 ऑगस्ट रोजी हे ट्विन टॉवर पाडण्यात येणार आहे. यापूर्वी सीबीआरआयनंही मान्यता दिलीय.

Supertech Emerald Court Twin Towers
Women Pilot : जगात महिला वैमानिकांची संख्या भारतात सर्वाधिक; जाणून घ्या काय आहे खास

या महिन्याच्या सुरुवातीला सर्वोच्च न्यायालयानं नोएडामध्ये नियमांचं उल्लंघन करून बांधलेलं सुपरटेक लिमिटेडचं ​​४० मजली टॉवर पाडण्याची मागणी करणारी एनजीओची याचिका फेटाळून लावली होती. पर्यायी उपाय निर्देशित करण्याची विनंती करण्यात आली होती. न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड आणि सुधांशू धुलिया यांच्या खंडपीठानं 'सेंटर फॉर लॉ अॅण्ड गुड गव्हर्नन्स' या स्वयंसेवी संस्थेला 5 लाख रुपयांचा दंडही ठोठावला होता.

Supertech Emerald Court Twin Towers
गुजरातमध्ये भीषण अपघात; काँग्रेस आमदाराच्या जावयानं 6 जणांना चिरडलं, सर्वांचा मृत्यू

सीबीआरआयनंही दिली मान्यता

यापूर्वी, सेंट्रल बिल्डिंग रिसर्च इन्स्टिट्यूटनं (CBRI) सेक्टर-93-A, नोएडा स्थित सुपरटेकचे दोन्ही टॉवर पाडण्यासाठी मंजुरी दिलीय. एडफिस अभियांत्रिकी, सुपरटेक व्यवस्थापन आणि सीबीआरआयच्या प्रतिनिधींची बुधवारी नोएडा प्राधिकरणात बैठक झाली. सीबीआरआयनं एडफिस इंजिनिअरिंगला स्फोटकं बसवण्याची परवानगी दिली होती. परंतु, सुपरटेक व्यवस्थापनावर स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात अडथळे आले होते. ज्या टॉवर्स पाडायच्या आहेत, त्यांच्या आजूबाजूच्या इतर टॉवर्सचा स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्ट सुपरटेक व्यवस्थापनानं अद्याप सादर केलेला नाहीय. हा अहवाल १५ ऑगस्टपर्यंत देण्याचा दावा सुपरटेक व्यवस्थापनानं केलाय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com