Patanjali Ayurveda Misleading Ads : त्या जाहिराती आजच्या आज बंद करा; सर्वोच्च न्यायालयानं रामदेव बाबांना फटकारलं

Supreme Court On Patanjali Ayurveda Patanjali Ayurveda Misleading Ads : सर्वोच्च न्यायालयाने रामदेव बाबा यांच्या पतंजली आयुर्वेद (Patanjali Ayurved) कंपनीला दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीवरून चांगलेच फटकारले आहे.
Baba Ramdev Patanjali Ayurveda Misleading Ads Latest News
Baba Ramdev Patanjali Ayurveda Misleading Ads Latest News

Supreme Court On Baba Ramdev Patanjali Ayurveda Misleading Ads Latest News : सर्वोच्च न्यायालयाने रामदेव बाबा यांच्या पतंजली आयुर्वेद (Patanjali Ayurved) कंपनीला दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीवरून चांगलेच फटकारले आहे. तसेच या कंपनीविरोधात कारवाई का करण्यात आली नाही असा प्रश्न देखील विचारला. कोर्टाने पंतजली आयुर्वेदच्या आरोग्य संबंधीत सर्व जाहिरातींवर बंदी घातली आहे. कंपनी यापुढे अशा जाहिराती करू शकणार नाहीये.

कंपनीच्या जाहिरातींविरोधात इंडियन मेडिकल असोसिएशनने कोर्टात याचिका दाखल केली होती. यावर आज सुप्रीम कोर्टाने या पकरणावर निकाल दिला. सर्वोच्च न्यायालयाने पंतजली आयुर्वेद आणि आचार्य बालाकृष्णन यांना दिशाभू करणाऱ्या जाहिरातींच्या प्रसिद्ध केल्याप्रकरणी कोर्टाचा अवमान केल्याबद्दल नोटीस पाठवण्यात आली आहे. (Supreme Court Ban On Patanjali Ayurveda Misleading Ads)

Baba Ramdev Patanjali Ayurveda Misleading Ads Latest News
Manoj Jarange : अपशब्द वापरले असतील तर....; जरांगे पाटलांनी मागितली शिंदे-फडणवीसांची माफी

या कंपनीच्या जाहिराती अनेक मीडिया प्लॅटफॉर्म्सवर दाखवल्या जातात, ज्यामध्ये अनेक चुकीचे दावे केले जातात असे इंडियन मेडिकल असोसिएशनचे म्हणाणे आहे. अवमान याचिकेवर उत्तर देण्यासाठी कंपनी आणि मालक बालाकृष्णन यांना कोर्टाने तीन आठवड्यांचा वेळ देण्यात आला आहे.

Baba Ramdev Patanjali Ayurveda Misleading Ads Latest News
Devendra Fadnavis: जरांगेंना घरात येऊन भेटणार नेते कोण? देवेंद्र फडणवीसांचा रोख कोणाकडे?

सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश हिमा कोहली आणि जस्टिस ए. अमानु्ल्लाह यांच्या खंडपीठाने यापूर्वी दिलेल्या आदेशाचे पालन न केल्याबद्दल देखील टीका केली आहे. गेल्या वर्षी कोर्टाने कंपनीला जाहिरातींवर बंदी घालण्याचे आदेश दिले होते. नोव्हेंबर महिन्यात कोर्टाने पतंजलीला सांगितले होते की आदेशाचे पालन केले गेले नाही तर चौकशीनंतर कंपनीच्या सर्व प्रॉडक्ट्सवर एक-एक कोटींचा दंड लावण्यात येईल.

पहिल्या आदेशाचा हावाला न्यायालयाने म्हटले की, कोर्टाने दिलेल्या सर्व इशारे देऊनही तुम्ही तुमची औषधे केमिकलयुक्त औषधांपेक्षा चांगली आहेत अशा दावा करताय. अखेर कंपनीच्या जाहिरातींविरोधात काय कारवाई केली गेली? असा सवालही कोर्टाने आयुष मंत्रालयाला विचारला. सरकारच्या वतीने एएसजीनी सांगितलं की याबद्दल डेटा गोळा केला जात आहे. कोर्टाने केंद्र सरकारच्या या उत्तरावर नाराजी व्यक्त केली आणि कंपनीच्या जाहिरातींचे मॉनिटरिंग करण्याचे आदेश दिले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com